लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर - कोरोना जागतिक महामारीत कोरोनाग्रस्तांना प्लाझ्माची गरज भासते आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये प्लाझ्माची मदत होते. यासाठी अष्टविनायक ब्लड सेंटरमध्ये प्लाझ्मा दान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्लाझ्मा दानासाठी प्लाझ्मादात्यांनी पुढे यावे, असे आवाहन अष्टविनायक ब्लड सेंटरच्या वतीने संचालक डॉ. शैलेंद्र पाटणकर यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना डॉ. पाटणकर म्हणाले की,प्लाझ्मा दान करण्यासाठी तुमचे वय 18 ते 60 व वजन 50 किलो असावे, हिमोग्लोबिनचे प्रमाण 12.5% पेक्षा जास्त असावे, पूर्वी रक्तदान केलेले असावे, कोरोनातून बरे होऊन 28 दिवस झालेले असावे, कोरोनासाठीची लस घेऊन 14 दिवस झालेले असावे, प्लाझ्मा दानापूर्वी रक्तदात्याने कोविड अँटिबॉडिज चाचणी करणे आवश्यक आहे. 15 दिवसांच्या फरकाने तुम्ही पुन्हा प्लाझ्मा दान करू शकता.
अधिक माहितीसाठी व प्लाझ्मासाठी गरजूंनी व इच्छुक प्लाझ्मादात्यांनी अष्टविनायक ब्लड सेंटर, आकाशवाणी केंद्रासमोर, प्रोफेसर कॉलनी चौक, अ.नगर, फोन नं. (0241) 2421334 व 2421335 वर संपर्क साधावा.
0 टिप्पण्या