लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
संगमनेर शहरातील
तीन बत्ती चौकात ही घटना घडली. पोलिस कर्मचारी सलमान शेख यांनी दिलेल्या
फिर्यादीवरून पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला,
जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख यांच्यासह अन्य अनोळखी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दंगलीसह सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा
त्यांच्याविरुद्ध नोंदविण्यात आले आहेत. घटनेनंतर बहुतांश आरोपी पळून गेले असून
त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
शहरातील या चौकात राज्य राखील दलाची तुकडी तैनात
आहे. गर्दी जमल्याने ती पांगविण्यासाठी पोलिस गेले. सुरुवातीला त्यांची जमावासोबत
बाचाबाची झाली. पोलिसांना जमावातील काही जणांनी धक्काबुक्कीही केली. गर्दीतील
अनेकांनी मास्क लावलेले नव्हते. सुरक्षित अंतर पाळले जात नव्हते. त्यामुळे गस्ती
पथकातील राज्य राखीव दलाच्या जवानांनी तेथे जमलेली गर्दी हटवण्याचे प्रयत्न केला.
तर जमावाने त्यांच्यावरच हल्ला केला. जमाव वाढत जाऊन दगडफेकही सुरू झाली. चौकात
एका झाडाखाली पोलिसांनी उभारलेला तंबूही जमावाने उखडून टाकला. जमावाच्या तुलनेत पोलिसांची
संख्या कमी होती. शिवाय जमाव आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी तेथून काढता पाय
घेतला. दगडफेकीत काही खासगी वाहनांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह
अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तेथे आला. पोलिस व जमाव आमने-सामने आल्याने शहरात काही
काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर गर्दी पांगली आणि वातावण निवळले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी फळे घेण्यासाठी काही
नागरिक बाहेर पडले होते. त्यांची गर्दी वाढत असल्याने सुरुवातीला तेथील पोलिसांनी
त्यांना हटकले. त्यातील काही जणांशी बाचाबाची सुरू असतानाच गर्दी वाढत केली.
सुरुवातीला पोलिसांनी गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव वाढतच गेल्याने पोलिसांचा नाइलाज झाला.
0 टिप्पण्या