Ticker

6/Breaking/ticker-posts

कोविड रुग्णांसाठी डेन्टल काॅलेज मधील २००डेन्टल मशीन आॅक्सिजन बेड म्हणून वापराव्यात- तुपे

  


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर :सध्या सामान्य व गरजु रुग्णांना आॅक्सिजन बेड कमी पडत असल्याने नगर तालुक्यातील डेन्टल काॅलेज मधील २०० डेन्टल मशीन या आॅक्सिजन बेड म्हणून वापरल्यास अनेक गरीब गरजू रुग्णांचे बेड वाचून होणारे मृत्यू वाचतिल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री अशोकराव तुपे यांनी केली आहे..


याबद्दलची सविस्तर माहिती देताना दंततज्ञ डॉ सुदर्शन गोरे म्हणाले की," डेंटल कॉलेजच्या मधील डेंटल चेअर मशीन चा वापर आपण आॅक्सिजन बेड म्हणून करू शकतो. या डेंटल मशीन ला ट्यूब द्वारे एअर  काॅम्प्रेसर मधुन हवा पुरवलेली असते. या एअर काॅम्प्रेसर ऐवजी आॅक्सिजन सिलिंडर व मास्क जोडल्यास ही डेंटल मशीन आॅक्सिजन बेड मध्ये रुपांतरीत होऊ शकते.व या आपत्कालीन परिस्थितीत यांचा वापर अनेक रुग्णाचा जिव वाचविण्यासाठी करता येईल. विशेषत सर्व डेंटल कॉलेज हि कोविड कालावधीत रूग्णांअभावी व विद्यार्थ्यांअभावि मागील एक वर्षापासून बंद आहेत. प्रत्येक डेंटल कॉलेज मध्ये शिकाऊ डॉक्टर, प्रशिक्षित मेडिकल स्टाफ, नर्सिंग स्टाफ हा उपलब्ध आहे तसेच डेंटल कॉलेज हे सेवाभावी हाॅस्पिटल ला संलग्न असते या सर्वांचा उपयोग २०० बेड आॅक्सिजन असलेल्या कोविड रुग्णांसाठी होऊ शकतो. नगर जिल्ह्यात वडगाव गुप्ता, लोणी प्रवरानगर व संगमनेर येथे डेंटल कॉलेज असुन या प्रत्येक ठिकाणी २०० ऑक्सिजन' बेड चे कोविड सेंटर कार्यरत होऊ शकते.


शेवटी सामाजिक कार्यकर्ते श्री अशोकराव तुपे म्हणाले." स्थानिक प्रशासनाने व डेंटल कॉलेज प्रसासनाने पुढाकार घेऊन नगर जिल्ह्यात ६०० रूग्णांना आॅक्सिजन बेड उपलब्ध होऊन गरीब व गरजू रुग्णांचे प्राण वाचतील.तसेच महाराष्ट्रात व देशात देखील डेंटल मशीन चा वापर आॅक्सिजन बेड म्हणून केल्यास हा प्रयत्न यशस्वी ठरू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या