लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: रेमडेसिवीर इंजेक्शनचा आवश्यक पुरवठा करून घेणे, ही त्या रुग्णालयाची जबाबदारी असून, कोणत्याही रुग्णालयाने रेमडेसिवीर इंजेक्शन मागणीची औषधचिठ्ठी रुग्णास वा रुग्णाच्या नातेवाईकांस देऊ नये, असे आदेश नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोविड रुग्णालयांना दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असेही सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे रुग्णालयानांच औषधाचा पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ आणि मनस्तापही कमी होणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार, रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा हा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केला जात आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर हा राज्य
टास्क फोर्स तसेच आयसीएमआर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्याची दक्षता
रुग्णालयांनी घ्यावयाची आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले
आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील करोनारुग्णांवर उपचार करणारी
महानगरपालिकेची व खासगी करोना उपचार केंद्रे व करोना समर्पित रुग्णालयांची सूची
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयांना स्वतः हा साठा
उपलब्ध करून घेता येणार आहे.
0 टिप्पण्या