लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नाशिक : ज्या नागरिकांनी कोव्हिशील्ड लशीचा पहिला डोस घेतला असेल, त्यांना आता ८४ दिवसांनंतरच दुसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. कोव्हिड प्रतिबंधक
लशींच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर नागरिक रोजच हातघाईवर
येत आहेत. एकदा लस घेतल्यानंतर दोन डोसमध्ये नेमके किती अंतर असावे, असा प्रश्नही ग्रामस्थांना सतावतो आहे.
'कोव्हॅक्सिन' चार आठवड्यांनंतरच
दरम्यान, कोव्हॅक्सिन लशीच्या दुसऱ्या डोसबाबत नियमांमध्ये
कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
पूर्वीप्रमाणेच चार आठवड्यांनी देण्यात येणार आहे. याशिवाय वयोगट १८ ते ४४ मधील
लाभार्थींचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र
लाभार्थींनीच ऑनलाइन नोंदणीच्या कन्फर्मेशननंतरच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य सभापती
सुरेखा दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी
केले आहे.
0 टिप्पण्या