लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
करोनाची तिसरी लाट येणार असल्याचा सुतोवाच
करण्यात येत आहे. यावेळी लहान मुलांना मोठ्या प्रमाणात करोनाचा धोका आहे. त्यामुळे
यासाठी नियोजन सुरू करण्यात आलं आहे. तशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
दिल्या आहेत, अशी माहिती
यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना रोखण्यासाठी लसीकरण आणि ऑक्सिजन
वाढवण्याची तयारी सुरू आहे. सध्या राज्याची १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी आहे
असं ते म्हणाले. तर भारतीय बायटेकने पुण्यामध्ये लसीकरण निर्मिती करण्यासाठी तब्बल
२८ एकर जमिनीची मागणी केली असून त्यासाठी सगळ्या परवानग्या देण्यात आल्याची
माहितीही अजित पवारांनी दिली.
अजितदादांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- लहान मुलांनाही पण लस देण्यावर भर
देण्यात येईल
- भारत बायोटेकने जिल्ह्यात 28
एकर जमीन मागितली
- हा प्रकल्प सुरू होण्यासाठी तीन
महिने लागतील
- पुण्यात तयार होणारी लस ही
केंद्रालाही द्यावी लागेल पण राज्याला ५० टक्के लस देण्यावर चर्चा करणार
- १० कोटींपर्यंत लस उत्पादनाचं
नियोजन आहे. कारण राज्यात प्रत्येकाला लस देणं महत्वाचं
- विदर्भात रेमडेसिवीरचा पुरवठा
सुरळीत, गडकरींची फोनवरून माहिती
- माणसाचा जीव महत्वाचा आहे.
त्यामुळे आता मी कोणतेही राजकारण केलं नाही, ही टोलवाटोलवी
करायची वेळ नाही
0 टिप्पण्या