Ticker

6/Breaking/ticker-posts

वाढदिवसानिमित्त कोव्हिड रुग्णांना सुग्रास भोजन व अन्नधान्य भेट

 सुरेश (बापू) केरू विधाते यांचा आदर्श उपक्रम

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


  चिचोंडी पाटील  :   ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील येथील कोव्हिड रुग्णांना आष्टी तालुक्यातील नांदूरचे सुपुत्र सुरेश (बापू) केरुसाहेब विधाते यांनी त्यांचे सुपुत्र श्रीराम बापू विधाते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णांना बिर्याणी जेवण,२०० अंडी,एक क्विंटल उच्च प्रतीचा तांदूळ,50 किलो दाळ आदी अन्नधान्य  भेट म्हणून दिले आहे.

सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस  प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे, रुग्ण संख्या वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्यापेक्षा तो खर्च टाळून  कोव्हिड रुग्णांना जेवण,अंडी,अन्नधान्य दिले आणि रुग्ण सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा असल्याचे बापू केरुसाहेब विधाते यांनी सांगितले. हरिओम हेल्पलाइन च्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ग्रामस्थांनी, समाजसेवकांनी कोव्हिड रुग्णांना  मदत केली आहे. रुग्णालयास रुग्णवाहिका,ऑक्सीजन सिलेंडर, मास्क,सॅनिटायझर, औषधे,अन्नधान्य दिले असल्याची माहिती हरिओम हेल्पलाइन चे युवा नेते, मा.उपसरपंच शरद भाऊ पवार यांनी दिली.

सुरेश (बापू) विधाते यांनी त्यांचे सुपुत्र श्रीराम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णांसाठी बिर्याणीचे जेवण,अन्नधान्य देऊन एक वेगळा पायंडा पाडून व अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे दाखवून दिले आहे. चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त अनेक रुग्ण उपचार घेत आहेत त्यांना हरी ओम हेल्पलाईन च्या वतीने दररोज जेवण,उकडलेली अंडी दिल्या अनेक वेळा चिकन बिर्याणी तसेच फळे सुद्धा दिलीअनेक वेळा चिकन बिर्याणी तसेच फळे सुद्धा दिली जातात. अनेक दानशूर अन्नदाते हरिओम हेल्पलाइन ला मदत करीत आहेत. अशीच अन्नधान्याची मदत सुरेश विधाते यांनी श्रीराम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली याबद्दल रुग्णालय प्रशासनाने, हरिओम हेल्पलाइन शरद भाऊ पवार यांनी सुरेश विधाते, श्रीराम विधाते,यांचे आभार मानले. तसेच नांदूर,चिचोंडी पाटील, आठवड,सांडवे, मांडवे,दशमीगव्हाण,भातोडी व  पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी, नगर तालुक्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या आदर्श उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी नांदूरचे सुपुत्र सुरेश (बापू)केरुसाहेब विधाते,चिचोंडी पाटीलचे मा.उपसरपंच शरद पवार, मनियार सर, ,युवराज हजारे, नांदूर चे उपसरपंच निलेश साळवे,निलेश कोकाटे, रुग्णालय डॉक्टर व कर्मचारी आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या