लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्ली : करोना
व्हायरस महामारीमुळे वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढले आहे. याकाळात लोकं मोठ्या
प्रमाणात ऑनलाइन फीचर्सचा वापर करत आहेत. एका रिपोर्टनुसार, महामारीमध्ये
वर्ष २०१९ च्या तुलनेत फिशिंगआणि सायबर फसवणुकीचे प्रमाण २४२
टक्क्यांनी वाढले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२० मध्ये रिमोट डेस्कटॉप
प्रोटोकॉलवर जवळपास ३३० कोटी हल्ले झाले. या दरम्यान भारतात ३.६ कोटी हल्ले झाले, जे २०१९ मध्ये
झालेल्या १.८ कोटी हल्ल्यांपेक्षा दुप्पट आहेत. सायबर सिक्युरिटी रिसर्चरने गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोरवर १६७
बनावट अॅप्स आढळले, जे सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीशी
संबंधित होते.
१६७ अॅप्सच्या तपासणीत अनेक बाबी समोर
येतात. एका ब्रिटिश सायबर सिक्युरिटी रिसर्चरने प्ले स्टोर आणि अॅप स्टोरवर १६७
बनावट अॅपची ओळख केली. या अॅप्सला तपासल्यावर समोर आले की हे सर्व अॅप्स
फायनेंशियल ट्रेडिंग, बँकिंग
किंवा ब्लॉकचेन आधारित फायनेंशियल अॅप आहेत. या अॅप्सचे इंटरफेस आणि इन-अॅप
फंक्शन लोकप्रिय कंपनी Barclays, Binance, TDBank आणि BitCoinHK सारखे होते. या बनावट अॅप्समध्ये चॅट बॉट सपोर्ट देखील देण्यात आले होते,
जे फायनान्स, ट्रेंडिंग, बँकिंग अथवा ब्लॉकचेन आधारित फायनान्स अॅपप्रमाणेच काम करत असे. सायबर
सिक्युरिटी रिसर्चरने या १६७ बनावट ट्रेडिंग आणि ब्लॉकचेन आधारित फायनेंशियल अॅपच्या
सिंगल सर्व्हरबाबत देखील माहिती दिली. याद्वारे स्पष्ट होते की या सर्व अॅप्सला
एक ग्रुप अथवा स्कॅमरद्वारे कंट्रोल केले जाते.
डेटिंग अॅप्सचा वापर
सायबर क्रिमिनल आणि सुरक्षेच्याबाबत
सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण होत आहे. अशात सायबर गुन्हेगार लोकांना
फसवण्यासाठी इतर पद्धतींचा वार करत आहे. सायबर गुन्हेगार लोकप्रिय डेटिंग अॅपद्वारे
लोकांना फसवतात व त्यांच्याकडून अॅक्सेस मिळवतात. डेटिंग अॅपद्वारे लोकांना
बनावट अॅप्सची लिंक पाठवून डाउनलोड करण्यास सांगितले जाते.
सायबर गुन्हेगार डेटिंग प्लॅटफॉर्मवर एक
प्रोफाइल लावतात आणि व्यक्तीशी मैत्री करतात. त्यानंतर त्यांना अॅप इंस्टॉल
करण्यास सांगितले जाते. बनावट अॅप्समध्ये पैसे अथवा क्रिप्टोकरेंसी जमा करम्यास
सांगतात. यानंतर व्यक्ती त्यातून पैसे काढू इच्छित असल्यास गुन्हेगार त्यांच्या अॅक्सेसला
ब्लॉक करतात. या प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप
स्टोवरूनच विश्वासार्ह्य अॅप्स इंस्टॉल करावेत.
0 टिप्पण्या