Ticker

6/Breaking/ticker-posts

कोविड-१९ : राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित करावी-राजेंद्र निमसे

 अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 नगर :पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वाढत्या  कोविड १९ या महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा स्थगित  करून  त्या पूढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात कोविड-१९ चा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोविड विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी 

शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे कार्यालयाकडून पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या आयोजना संबधी पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे.

सद्यस्थितीत राज्यात कोविडची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत असून जनतेच्या मनामध्ये प्रचंड भिती पसरलेली आहे.याच कारणास्तव महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून इयत्ता बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.ही वस्तुस्थिती असतांना शिष्यवृत्ती परीक्षेचे सद्यस्थितीत आयोजन करणे उचित ठरणार नाही.तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाकडून  किमान ५०% विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसवण्याचे स्पष्ट निर्देश असताना देखील महाराष्ट्र राज्यातील काही जिल्हा परिषदा  यांनी हे आदेश डावलून  १०० % विद्यार्थी  या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ठ केल्यामूळे लाखो विद्यार्थ्यांची ही परीक्षा होत आहे.सद्यस्थितीत कोविड-१९ च्या महामारीमूळे राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे.पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे..

     त्यामुळे कोविड बाबतीतील प्राप्त परिस्थितीचा विचार करता इ.५वी व ८वी ची शिष्यवृत्ती परीक्षा ही स्थगित करण्यात येऊन ती पुढे ढकलण्यात यावी,असे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

या  शिष्यवृत्ती परीक्षेला  स्थगिती मिळावी यासाठी  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे आदींसह शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाढेंकर, जिल्हा कोषाध्यक्ष संजय शेळके, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी  ढाकणे,सुधीर रणदिवे ,विलास लवांडे प्रकाश पटेकर,बापूराव वावगे, मधुकर डहाळे,संजय सोनवणे, नंदू गायकवाड,पांडुरंग देवकर ,प्रवीण शेळके, अशोक दहिफळे, आदिनाथ पोटे, राजेंद्र गांगर्डे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके,जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके ,बँकेच्या माजी संचालक संगीता निमसे, जिल्हा उपाध्यक्ष  उज्वला घोरपडे, मनीषा क्षेत्रे ,संगीता निगळे, सुरेखा बळीद आदी पदाधिकारी हे प्रयत्नशील आहेत.अशी माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या