लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: राज्यात १ मेपासून १८ ते ४४
वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्हयांत
ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरणाची सत्रे आयोजित करण्यात आले होते.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले,
असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले.
नाशिकमध्ये २७६ जणांनी घेतली लस
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या
पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. १ मे अखेर जिल्ह्यात ६५ हजार ६८८ जणांना पहिला
डोस देण्यात आला आहे. तर २९ हजार ७२ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. म्हणजेच २९
हजार ७२ आरोग्यकर्मींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याशिवाय ५७ हजार ९०९ फ्रंटलाईन
वर्कर्सने पहिला डोस तर २१ हजार ९७६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
नागपूरमध्ये रविवारी दहा झोनमधील दहा केंद्रांवर लसीकरण
नागपूर शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांच्या
लसीकरणासाठी रविवारी २ मे रोजी मनपाच्या दहा झोनमधील दहा केंद्रांवर लसीकरण सुरू
राहणार आहे. १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी
रुग्णालय गांधीनगर, पाचपावली
सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहिल, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. विशेष म्हणजे १८
ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन
नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच
वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी,
असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या