Ticker

6/Breaking/ticker-posts

सतर्क राहा ! रायगड किनारपट्टीवर पहाटे धडकणार तौक्ते चक्रीवादळ

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 रायगडः मध्य-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ आता वेगानं मुंबईकडे सरकरत आहे. कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर वादळानं कोकण किनारपट्टीवरही हाहाकार माजवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून हे वादळ आता रायगडाकडे कूच करत आहे. आज मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास तौक्ते रायगड किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तौक्ते चक्रीवादळाचा धोका मुंबईला नसला तरी मुंबईतील काही भागात वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या वादळाचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात जाणवणार आहे. रायगड किनारपट्टीवर पहाटे वादळाचा तडाखा  बसण्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

वादळाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यालगतच्या रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येत आहे. अलिबाग, श्रीवर्धन, उरण, मुरुड या तालुक्यातील २५०० लोकांचे स्थलांतर करण्यात आलं असून त्यांना शाळा व इतर ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील ६२ गावे, तसेच खाडी किनाऱ्यावरील १२८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दि.17१७ मे रोजी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार 'तौत्के' चक्रीवादळाने भीषण रुप घेतले आहे. हे वादळ उद्या म्हणजे १७ मे रोजी सोमवारी संध्याकाळी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. १८ मे रोजी म्हणजे मंगळवारी सकाळी पोरबंदर आणि महुआच्या पुढे जाईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्र, केरळ आणि गुजरातच्या समुद्र किनारपट्टी भागांमध्ये तीन दिवस दिसून येईल. दरम्यान, चक्रीवादळामुळे ताशी १५० ते १६० वेगाने वारे वाहू शकातात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या