Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोनापासून बचावासाठी १५० कुटुंबांना मल्टीविटामिन गोळ्यांचे वाटप

 घोसपुरी सोसायटीचे संचालक सुनिल ठोकळ यांचा स्वखर्चातून उपक्रम

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

नगर – कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी नगर तालुक्यातील घोसपुरी सोसायटीचे संचालक सुनिल ठोकळ यांनी घोडकेवाडी आणि ठोकळवाडी येथील सुमारे १५० कुटुंबांना विटामिन सी आणि मल्टी विटामिन या औषधी गोळ्यांचे स्वखर्चातून मोफत वाटप केले.

सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातलेले आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याने दवाखान्यात रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झालेले आहे. ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावरही नागरिक कोरोना बाधित होत आहेत. अनेक नागरिकांना या महामारीत आपला जीवही गमवावा लागलेला आहे. या रोगापासून बचावासाठी सध्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे या शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी सुनिल ठोकळ यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वखर्चाने सामाजिक भावनेतून विटामिन सी आणि मल्टी विटामिन या औषधी गोळ्यांचे घोडकेवाडी आणि ठोकळवाडी येथील सुमारे १५० कुटुंबांना मोफत वाटप केले.कुटुंबातील प्रत्येकाला १० दिवसांच्या गोळ्या देण्यात आल्या.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर, सारोळा कासार आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सुविधा धामणे, डॉ.राहुल धामणे, विठ्ठल घोडके, राजू घोडके यांच्यासह घोडकेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

घोडकेवाडी आणि ठोकळवाडी येथील एकाही व्यक्तीला कोरोना उपचारासाठी दवाखान्यात जाण्याची वेळ येवू नये, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी हा सामाजिक भावनेतून उपक्रम राबविला असल्याचे सुनिल ठोकळ यांनी सांगितले. गावोगाव प्रत्येकाने अशा प्रकारचा उपक्रम राबवून या संकटाच्या काळात गोरगरिबांना मदत करावी असे आवाहनही सुनिल ठोकळ यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या