Ticker

6/Breaking/ticker-posts

पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचा निकाल झटपट



 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू असतानाच, विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस संपूर्ण अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्याचा विद्यापीठाकडून प्रयत्न केला जाणार आहे. यापूर्वी, सत्र परीक्षा झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना साधारण तीन महिन्यांपर्यंत निकालाची प्रतीक्षा असायची.

करोना प्रादुर्भावामुळे पुणे विद्यापीठाच्या २२३ अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर २०२०च्या सत्र परीक्षांना १० एप्रिलला ऑनलाइन प्रॉक्टर्ड पद्धतीने सुरुवात झाली. त्यापैकी १२१पेक्षा अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत, तर उर्वरित परीक्षा येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहेत. पुणे विद्यापीठाने परीक्षा पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमांचे निकाल प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे. बुधवारपर्यंत सहा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असून, आता दररोज काही अभ्यासक्रमांचे निकाल प्रसिद्ध होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.

पुणे विद्यापीठाच्या साधारण ७१ अभ्यासक्रमांना इंटर्नल गुण असल्याने, या अभ्यासक्रमांच्या एक्स्टर्नल परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे निकाल प्रसिद्ध करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. महाविद्यालयांकडून इंटर्नल आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ज्याप्रमाणे प्राप्त होतील, त्याप्रमाणे निकाल जाहीर होणार आहेत. मे महिन्याच्या अखेरीस संपूर्ण अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होतील. कमी कालावधीत निकाल प्रसिद्ध होत असल्याने, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण; तसेच अनुत्तीर्ण असणाऱ्या विषयांची माहिती मिळणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण विषयांसोबतच आगामी सत्र परीक्षांची तयारी करण्यास मदत होणार आहे. निकाल लवकर जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षां जाहीर                        

 

“ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहा अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, येत्या ३० मेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होईल. साधारण १० मेपर्यंत विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आटोपतील. त्यानंतर १५ मेपासून आगामी सत्र परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची लिंक सुरू होईल.”

-डॉ. महेश काकडे, संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापी'इंटर्नल गुण तातडीने पाठवावेत'


विद्यापीठांच्या सत्र परीक्षांची मोठी जबाबदारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची असली, तरी संपूर्ण प्रक्रियेला आवश्यक ते सहकार्य करण्याची जबाबदारी विद्या परिषद सदस्य आणि अधिष्ठातांची असते. मात्र, परीक्षांची संपूर्ण जबाबदारी सध्या एकट्या परीक्षा व मूल्यमापन मंडळावर असल्याचे चित्र आहे. महाविद्यालयांनी इंटर्नल; तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण लवकर पाठवावेत, अशा सूचना परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिल्या आहेत. मात्र, महाविद्यालयांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे इंटर्नल आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण तातडीने पाठवण्याची आवश्यकता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या