लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
' काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य
लढ्यातून लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षानं अनेक सामान्य
कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोट्यांचे नेतृत्व करणारी
मंडळी थोर होती. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, नाना पाटील हे सर्व एके काळी काँग्रेसचे धुरंधर होते. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी उभी
हयात काँग्रेस पक्षात घालवली. आज अशी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास
जबाबदार कोण? प. बंगालात ममता बॅनर्जी, आसामात हेमंत बिस्व सरमा, पुद्दुचेरीत एन.
रंगास्वामी हे मूळचे काँग्रेसी असलेले नेते इतरत्र जाऊन मुख्यमंत्रिपदी विराजमान
झाले, यास जबाबदार कोण? असा सवाल
शिवसेनेनं केला आहे.
' पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज
आहे, असं म्हणणाऱ्या काँग्रेसमधील ‘जी-२३’
(ज्येष्ठ नेत्यांचा एक गट) गटालाही शिवसेनेनं टोला हाणलाय. 'अध्यक्ष असला नसला तरी पक्ष हा चालतच असतो. जमिनीवरचे कार्यकर्ते पक्षाचा
झेंडा पुढे नेत असतात. सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे हे एक महत्त्वाचे काम
आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी त्या कामी पुढाकार घ्यायला हवा,' असं शिवसेनेनं म्हटलंय.
राहुल गांधीं यांचं कौतुक
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं
शिवसेनेनं कौतुक केलं आहे. ' राहुल गांधींचा लढा एकाकी आहे. ते त्यांचं काम संयमानं करतात. त्यांच्यावर
प्रचंड टीका घाणेरड्या शब्दांत होत असताना मुद्द्याला धरून लढत राहतात. करोना
काळात राहुल गांधी यांनी घेतलेल्या अनेक मुद्द्यांवर सरकार पक्षाकडून टीकेची झोड
उठली, पण लसीकरणापासून पुढं इतर अनेक विषयांत सरकारनं राहुल
गांधींचीच भूमिका स्वीकारली. राहुल गांधी हेच आजही काँग्रेसचे सेनापती आहेत.
त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे .
0 टिप्पण्या