लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
औरंगाबाद
: एसटी सेवा बंद असल्याने आगामी महिन्यात एसटी
कर्मचाऱ्यांचा पगार विभागाला देता येणार नाही. त्यामुळे थकबाकीसाठी इतर विभागांना
पत्रे देऊन त्यांच्याकडील बाकी लवकरात लवकर भरण्याची मागणी एसटीने केली आहे.
औरंगाबाद स्मार्ट सिटी योजनेतंर्गत शहरात
शहर बस सेवा सुरू आहे. या सेवेसाठी एसटी विभागाचे कर्मचारी आणि त्यांची सेवा
स्मार्ट सिटीच्या कंपनी घेते. एसटीचे स्मार्ट सिटीकडे तीन कोटींवर पैसे राहिले
आहेत. एसटी विभागाकडून स्मार्ट सिटी कंपनीला पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे.
वारंट तालीम करण्यासाठी अनेक पोलिस कर्मचारी एसटी बसचा प्रवास करतात. त्याची
थकबाकी पोलिस विभागाकडे आहे. मुंबई कार्यालयाकडून याबाबत गृह विभागाला पत्रव्यवहार
करण्यात आला आहे. साधारण ६० कोटी रूपये गृह विभागाकडून एसटीला अदा केले जाणार आहे.
तसेच औरंगाबाद विभागांतर्गत निवडणूक
कार्यक्रमासाठी बसचा वापर केला जातो. या निवडणुकीसाठी एसटीचे साधारणत: १० ते १२
लाख रूपये जिल्हा प्रशासनाकडे थकित आहेत. ही थकबाकी देण्याबाबतही औरंगाबाद एसटी
विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
चंद्राबाबू नायडूंच्या प्रवासाचे ७४ हजार चर्चेत
आंध्र प्रदेशचे नेते एन. चंद्राबाबू नायडू
यांनी पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना एसटी
बसमधून आणले होते. नायडूच्या प्रवासाचा खर्च ७४ हजार रूपये असून अजूनही हा पैसा
देण्यात आला नाही. यामुळे हा खर्च कोण देईल?
यामुळे ७४ हजार रूपयांची वसुली थांबलेली आहे. जिल्हा प्रशासन,
पोलिस किंवा कारागृह प्रशासन या तिन्ही विभागाच्या अंतर्गत वादात ही
रक्कम अडकल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली.
सध्या एसटी बस बंद असल्यामुळे एसटीचे उत्पन्न थांबलेले
आहेत. कर्मचाऱ्यांचा पगारासह अन्य आवश्यक खर्च एसटीला परवडत नाही.
यामुळे आम्ही संबंधीत विभागांना पत्र देऊन,
या कठीण परिस्थितीत त्यांच्याकडील थकबाकी देऊन एसटीला मदत करावी.
अशा प्रकारचे पत्र लिहून त्यांच्याकडील देय रक्कम अदा करण्याबाबत विनंती करित आहोत
0 टिप्पण्या