Ticker

6/Breaking/ticker-posts

मुलांच्या नावे सहा बनावट कंपन्या ;अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई:- खंडणी आरोप प्रकरणात चौकशी झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या मुलांच्या नावे सहा बनावट कंपन्या असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांबाबत आता सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने शंभर कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना दिली होती, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिह यांनी केला आहे. त्यासंबंधी त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने देशमुख यांच्यासह अन्य संबंधितांची चौकशी केली होती. त्याचा अहवालदेखील न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. त्यानंतर आता बनावट कंपन्यांची माहिती समोर आल्याने सीबीआयकडून त्याचा तपास होण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीनुसार, या सर्व बनावट कंपन्यांचे मुख्यालय कोलकात्यात आहे. कोलकात्यात ज्या लाल बाजात भागात या कंपन्या आहेत, त्या भागात जवळपास ३८ हजार अशा बनावट कंपन्या आहेत. झोडिअॅक डीलकॉम, अयाटी जेम्स प्राइवेट लिमिटेड, काँक्रिट रिअल इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड, अटलांटिक व्हिस्टा रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड व काँक्रिट एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांचा त्यात समावेश आहे. या पाचही कंपन्या अनिल देशमुख यांची मुले सलील व हृषीकेश यांच्या नावे आहेत. यापैकी झोडिअॅक डीलकॉम नावे आतापर्यंत १६ लाख रुपयांची विक्री झालेली आहे. कंपनीकडे सध्या १०.३२ कोटी रुपयांची रोख असून ७.५६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची आर्थिक माहिती आहे. या बनावट कंपन्यांमध्ये काळ्या पैशांचा व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता सीबीआय करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या