Ticker

6/Breaking/ticker-posts

उद्योजक विजय मोरे,कालींदाताई पुंडे यांच्यातर्फे ऑक्सीजन सिलेंडर,रुग्णवाहिका लोकार्पण

 हरिओम ग्रुपचे शरदभाऊ पवार  यांनी केले होते आवाहन



चिचोंडी पाटील : ता.नगर ग्रामीण रुग्णालयास उद्योजक विजय मोरे, पुण्याच्या नगरसेविका कालींदा ताई पुंडे यांनी पी.पी किट,औषधे व रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.मा.उपसरपंच शरद भाऊ पवार, हरिओम मित्रपरिवार...( छाया: सोहेल मनियार )


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


चिचोंडी पाटील : ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील ता  जि.अहमदनगर या ठिकाणी कोव्हीड सेंटरमध्ये अनेक कोरोना रुग्ण ऑक्सिजन व रुग्णवाहिका अभावी मृत्यूशी झुंज देत आहेत. ग्रामीण  रुग्णालय व शरदभाऊ पवार मित्र मंडळ हरिओम हेल्पलाइन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आठवड ता. जि. अहमदनगर गावचे पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक व अमीर उद्योगसमूहाचे चेअरमन विजयजी झुंबर मोरे यांनी चिचोंडी पाटील,आठवड या पंचक्रोशीतील नागरिकांसाठी दोन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर व एक रुग्णवाहिका आणि त्यांच्या भगिनी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका कालींदाताई मुरलीधर पुंडे यांनी रुग्णांना वाफेचे मशीन, खोकल्याचे औषध, सॅनिटायझर, कोरोना संदर्भात मेडिसिन,पी पी किट आवाहन केल्यानंतर पाचच तासांमध्ये पुण्याहून त्वरित  पोहोच केले.

 लगेच गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी युवानेते शरदभाऊ पवार, स्मार्ट ग्राम आठवड  गावचे सरपंच राजेंद्रबापू झुंबर मोरे,उपसरपंच बाबासाहेब मोरे, डॉ राहुल पवार, डॉ. कांबळे मॅडम,संतोष कोकाटे ,विजय कोकाटे, समाजसेवक सुभाष दिलवाले, चंद्रकांत पवार,मामा परभने, संतोष वाडेकर, बबनराव शेळके,दत्ता जाधव, अमोल ठोंबरे, सुरेश पवार, गजू शेंदुरकर, चक्रपाणि ठोंबरे ,युवराज हजारे, भाऊ करांडे, दादा पवार, निखिल पवार, जितु गाडे, बाळू खकाळ व शरद भाऊ पवार हरिओम मित्रपरिवार उपस्थित होते.

 पुणे येथील उद्योजक विजय झुंबर मोरे व नगरसेविका सौ. कलिंदाताई पुंडे या दोन्ही बहीण भावाचे, तसेच शरद भाऊ पवार यांच्या प्रयत्नांमुळेच ऑक्सीजन सिलेंडर व रुग्णवाहिका,औषधे पी.पी. किट रुग्णालयास मिळाली याबद्दल उपस्थितांनी,रुग्णालय कर्मचाऱ्यांनी व रुग्णांनी आभार मानले.

कोरोना योद्धे होऊन, कोरोना रुग्णांची सेवा करण्यातच ईश्वर सेवा आहे असे मत मा.उपसरपंच शरदभाऊ पवार यांनी यावेळी व्यक करून कोरोणा रुग्णांना मदत करण्यासाठी शरदभाऊ पवार मित्र मंडळ हरिओम हेल्पलाइन व ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या