Ticker

6/Breaking/ticker-posts

शिक्षक संघाचा पाठपुरावा : राज्यव्यापी शिष्यवृत्ती परीक्षा अखेर स्थगित

 अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश- राजेंद्र निमसे










लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : २३ मे २०२१ रोजी होणारी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अखेर स्थगित करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने पत्राद्वारे कळवले असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व संघटक राजेंद्र निमसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

वाढत्या  कोविड १९ या महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा स्थगित  करून  त्या पूढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे व राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त मा .तुकाराम सुपे यांचेकडेस ६ मे २०२१ रोजी निवेदनाद्वारे केली होती.

सद्यस्थितीत राज्यात कोविडची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत असून जनतेच्या मनामध्ये प्रचंड भिती पसरलेली आहे.व रूग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेवून शिष्यवृत्ती परीक्षा घेणे योग्य ठरणार नसल्याचे तसेच या  कारणास्तव महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून इयत्ता बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.हीबाब निर्दशनास आणून दिली होती. 

त्यामुळे कोविड बाबतीतील प्राप्त परिस्थितीचा विचार करता इ.५वी व ८वी ची शिष्यवृत्ती परीक्षा ही स्थगित करण्यात येऊन ती पुढे ढकलण्यात यावी,असे निवेदन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.त्याचा विचार करुन २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आले बाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने पत्राद्वारे कळवले आहे. या परीक्षेला दिलेल्या स्थगिती मुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे

या  शिष्यवृत्ती परीक्षेला  स्थगिती दिल्याबद्दल  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे आदींसह शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाढेंकर, जिल्हा कोषाध्यक्ष संजय शेळके, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी  ढाकणे,सुधीर रणदिवे , संदीप भालेराव, प्रदीप चक्रनारायण ,विलास लवांडे, प्रकाश पटेकर,बापूराव वावगे, मधुकर डहाळे,संजय सोनवणे, महेश लोखंडे, नंदू गायकवाड,पांडुरंग देवकर ,प्रवीण शेळके, अशोक दहिफळे, विनायक गोरे, राहुल व्यवहारे,आदिनाथ पोटे, राजेंद्र सुतार, आदिल शेख, राजेंद्र गांगर्डे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके,जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके ,बँकेच्या माजी संचालक संगीता निमसे, जिल्हा उपाध्यक्ष  उज्वला घोरपडे, मनीषा क्षेत्रे ,संगीता निगळे, सुरेखा बळीद , वर्षा शिरसाठ, वसुंधरा जगताप आदी पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले. अशी माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या