Ticker

6/Breaking/ticker-posts

जगण्याच्या प्रबळ इच्छेने ८० वार्षिय दाम्पत्यांनी कोरोनावर केली यशस्वीरित्या मात.....!

*इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास बाळगण्याचा दिला मूलमंत्र......!

*केदारेश्वर कोविड सेंटरचा नाविन्यपूर्ण अनोखा यशस्वी उपक्रम.....!





लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

टाकळी मानुर : (विक्रम केदार ) शेकटे बुद्रुक येथील आप्पासाहेब गरड व त्यांच्या पत्नी शकुंतला गरड या ८० वर्षाच्या वृद्ध दाम्पत्यांनी ८ दिवस उपचार घेऊन   जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तिच्या बळावर कोरोनावर यशस्वीरित्या मात केली . यावेळी कारखाना प्रशासनाने तसेच कोविड सेंटरच्या वतीने त्या वृद्ध दाम्पत्यावर पुष्प वृष्टी करून त्यांना घरी जाण्यासाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला आहे.

  या दाम्पत्याला काल सोमवारी डिशचार्ज देखील देण्यात आला .  कोरोनावेळी रक्ताच्या नात्यातील व्यक्ती जवळ असणे गरजेचे असताना, कोरोना आजारात मात्र कोणीही जवळ असत नाही, याच मानसिकतेत कोरोनाग्रस्त रुग्ण मानसिकदृष्ट्या खचून जातो. एकाकी पडल्याचे त्याला जाणवते. यातून तो मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो. प्रसंगी त्याला मृत्यूलाही सामोरे जावे लागते. कोरोना आजार हा खूप मोठा नसून, सर्वत्र बनवलेले नकारात्मक वातावरण मात्र घातक ठरत आहे. मात्र आवश्यक ती काळजी, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार तसेच कोविड सेंटरवर असणाऱ्या भौतीक सुखसुविधेच्या आधारावर आणि उंच मनोबल, धैर्य राखून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केदारेश्वर कोविड केअर सेंटरवर उपचार घेत असलेले ७५ रुग्णापैकी ३१ रुग्णांनी कोरोणावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामध्ये 

 शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या संकल्पनेतून, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली यसेच तद्य संचालक ऋषिकेश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या १०० बेडचे केदारेश्वर कोविड केअर सेंटरमध्ये सेंटर सुरू झाल्यापासून ७५ रुग्ण दाखल झाले होते. त्यांपैकी ३१ रुग्णांना डिशचार्ज देखील देण्यात आले असून सर्वत्र या केदारेश्वर कोविड सेंटरचे कौतुक येत आहे. यावेळी डॉ प्रमोद जाधव, डॉ चंद्रशेखर घनवट, डॉ दीपक फुंदे, डॉ जैन, नंदकुमार गुठे, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, चीफ अकौंटट तीर्थक्षेत्र घुंगरड, अंबादास दहिफळे, विक्रम केदार, संजय चेमटे, गोविंद केकान, रामनाथ बटुळे यांच्यासह आदी कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.

मन धीट करा......!

कोरोनासारख्या आजाराला घाबरायचे नाही, आपण आपले मन धीट ठेवले पाहिजे, त्यामुळे कोणताच आजार जवळ येत नाही. आला तर त्याला रोखण्यासाठी मन धीट केले पाहिजे असे कोरोनामुक्त झालेल्या आप्पासाहेब गरड व त्यांची पत्नी शकुंतला गरड या वृद्ध जोडप्याने सांगितले तसेच प्रत्येकाने आप-आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे ते म्हणाले. 

कारखान्याच्या अध्यक्षांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा....!

संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड प्रताप काका ढाकणे यांनी देखील मोबाईल वरून या वृद्ध दाम्पत्यास शुभेच्छा देऊन येथील डॉक्टरचे आभार मानले व व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व सर्व रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या