Ticker

6/Breaking/ticker-posts

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेणार: उद्धव ठाकरे

 


लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई : SSC Exam 2021 Update: राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भातील आपली नेमकी भूमिका राज्य सरकारला न्यायालयात स्पष्ट करायची आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय येत्या दोनेक दिवसात घेतला जाणार आहे. करोना महामारीच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तूर्त राज्य मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे तर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ' परवा आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा हा विषय मांडण्यात आला होता. एक दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितलं आहे, त्यानंतर निर्णय घेऊ,' असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बारावीची परीक्षा आयोजित होणार असताना, दहावीची परीक्षा न घेण्यामागचं कारण काय असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे. पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची सुनावणी गुरुवारी झाली.


'
दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणामधील सर्वांत महत्त्वाची परीक्षा असते. मात्र, करोनाच्या कारणाखाली तुम्ही दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, बारावीची परीक्षा होणार आहे. हा काय गोंधळ आहे? दहावीच्या सीबीएसई मंडळांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नववीपर्यंत नियमित अंतर्गत मूल्यांकन झाले आहे. एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तसे नाही. त्यामुळे त्यांच्या मूल्यांकन पद्धतीची तुलना होऊ शकत नाही. असे असताना परीक्षांविनाच विद्यार्थ्यांना असे उत्तीर्ण केले जाऊ शकत नाही,' अशा परखड शब्दांत उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकार येत्या दोनेक दिवसात आपली परीक्षेसंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहे. त्याचीच माहिती ठाकरे
यांनी सिंधुदुर्गात पत्रकारांना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या