Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना रुग्णाचा कोंडला श्वास .. पण अखेर ..खा . सुजय विखेंच्या अँम्बुलन्समुळे मिळाला ' प्राण ' वायु

 लाल फितीचा कारभार ..शासकीय रुग्णवाहिका न आल्याने  रुग्णाच्या जिवावर बेतले .. पण दैव बलवत्तर ..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

खरवंडी कासार  :खरवंडी कासार येथिल संत भगवान बाबा कोव्हिड सेटंर मधील एका कोरोना रुग्णाचा ऑक्सीजन कमी झाल्यानतंर त्याला पाथर्डी उपजिल्हा रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी दोन तास रुग्णवाहीकेची वाट पहावी लागली तरीही शासकीय रुग्णवाहीका आलीच नाही अखेर खा . सुजय विखे यांच्या स्थाणीक विकास निधीतुन घेतलेली कोरडगाव मधील रुग्णवाहीका वेळेवर आल्यामुळे या रुग्णवाहिके मधुन सदर पेशंटला पुढील उपचारासाठी पाथर्डी येथे पोहोचविल त्यामुळे त्याला प्राण वायु मिळाल्याने त्याचा श्वास सुरु झाला . भगवान बाबा को व्हीड  सेंटरचे सचांलक दत्ता बडे यांनी खा . विखेचे आभार मानले .

          खरवंडी कासार येथे संत भगवानबाबा कोव्हीड  सेंटर सुरू झाल्यानतंर येथे कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण दाखल होत आहेत व त्यांच्या वर उपचार ही होत आहेत  मात्र या परिसरात रुग्णवाहीका नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत


    पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात  कोरोणा रुग्ण  संख्या वाढत आहे  परिसरात कोरोना मुळे मृत्यू झालेल्या व्यक्ती ची सख्यां जास्त आहे   या भागात कोहीड सेंटर ची गरज होती म्हणुन  जलक्रांतीचे प्रणेते दत्ता बडे,भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांच्या संकल्पनेतुन खरवंडी कासार येथे दोन दिवसापुर्वीच  लोकसहभागातुन  संत भगवानबाबा केविड सेंटर साकरले असुन या केविड सेंटरचे उदघाटन येळेश्वर संस्थाणचे महंत रामगिरी महाराज यांच्या ह्स्ते संपन्न झाले आहे 

      येथे ऑक्सीजण ची सुवीधा नसल्याने ज्या रुग्णाना जास्त त्रास होतो त्यांना पाथर्डी येथे पाठविले जाणार आहे . त्याप्रमाणे आज एका रुग्णाचा ऑक्सीजण कमी झाल्यामुळे त्या रुग्णाला पुढील उपचारा साठी पाथर्डी येथे पाठविण्यासाठी रुग्णवाहीका लवकर मिळाली नाही अखेर दत्ता बडे यांनी अजय रकताटे यांना कल्पना दिली त्यांनी  कोरडगाव येथे असणारी रुग्णवाहीका तात्तकळ पाठविली तेव्हा सगळया उपस्थिताचा जिव भांडयात पडला . परिस्थितीचे गांभिर्य ओळखून वेळेत सेवा दिल्या बद्दल अॅम्ब्युलन्स चालकाचे कौतुक होत आहे .


आम्ही लोकसहभागामधुन कोव्हीड सेटंर चालु केले आहे मुलभुत सेवा आम्ही देऊ मात्र प्रशासणाने वैद्यकीय सेवा औषधे रूग्णवाहीका या सेवा देऊन सहकार्य करावे असे निवेदन  खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील यांनी तहसिलदार यांना दिले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या