Ticker

6/Breaking/ticker-posts

मोठी बातमी : हुश्श..चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट अखेर समुद्रात कोसळलं..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय असलेले चीनचं तेअनियंत्रित रॉकेट अखेर समुद्रात कोसळले आहे. काही वेळापूर्वीच या रॉकेटचे अवशेष अरबी महासागरात कोसळल्याचे वृत्त एएफपीन्यूजने दिले आहे.

 

29  एप्रिल रोजी चीनकडून हे रॉकेट अंतराळात सोडण्यात आले होते. हे रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. मात्र, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या रॉकेटने पृथ्वीच्या दिशेने उलटा आणि अनियंत्रित प्रवास सुरु केला होता. हे रॉकेट पृथ्वीवर कोसळल्यास मोठे नुकसान होईल, अशी शक्यता चिनी माध्यमांनी वर्तविली होती. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हे रॉकेट नष्ट करण्यात आले. त्यानंतर रॉकेटचे तुकडे समुद्रात जाऊन कोसळले, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.


म्हणून अमेरिकेने तेरॉकेट अंतराळात उद्ध्वस्त केले नाही

अमेरिकेच्या लष्कराने आता नियंत्रणबाह्य चिनी रॉकेट उडवण्याची (शूट डाऊन) योजना नसल्याचे स्पष्ट केले होते. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी गुरुवारी माहिती दिली. हे रॉकेट समुद्र किंवा तत्सम मोकळ्या जागेवर कोसळून कोणालाही हानी पोहोचणार नाही, असा अंदाज ऑस्टिन यांनी व्यक्त केला होता.

रॉकेटचे वजन तब्बल 21 टन

अंतराळात रॉकेटचा मुख्य भाग फिरत होता. हाच भाग पृथ्वीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. रॉकेटचा हा भाग जवळपास 100 फूट लांब होते. याचे वजन तब्बल 21 टन होते. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना या रॉकेटचे तुकडे झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या रॉकेटचे काही अवशेष अरबी समुद्रात कोसळले आहेत.

रॉकेटचा वेग 7 किमी प्रतिसेकंद

पृथ्वीवर पडणाऱ्या या रॉकेटचे नाव लॉन्ग मार्च 5-बी वाय-2 (Long March 5B Y2 Rocket) असे होते. सध्या हे रॉकेट पृथ्वीच्या बाजूने लो-अर्थ ऑरबिटमध्ये फिरत होते. म्हणजेच हे रॉकेट सध्या पृथ्वीपासून 170 ते 372 किलोमीटर उंचीवर आहे. हे रॉकेट पृथ्वीभोवती तब्बल 25,490 किलोमीटर प्रतितास म्हणजेच एका सेकंदाला 7.20 किलोमीटर एवढ्या गतीने फिरत होते.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या