Ticker

6/Breaking/ticker-posts

' गुरुदत्त ' चा ६० गरीब कुटुंबांना मदतीचा हात ; किराणा माल कीटचे वाटप

 ज्येष्ठ साधक गिरीश साठे यांचे आर्थिक योगदान








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

शेवगाव :- तब्बल २० वर्षापासून  सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात आघाडीवर असलेल्या येथील गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रिडा संस्थेच्या वतीने अक्षयतृतीया व रमजान ईद सणाचे औचित्य साधून शेवगाव शहर व परिसरातील ६० गरजू व गरीब कुटुंबांना ५० हजार रुपये किंमतीच्या किराणा माल कीटचे वाटप तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुमाऊली योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांना अभिप्रेत असलेले कार्य ' गुरुदत्त ' संस्थेकडून अविरत सुरू आहे.             कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील नामांकित उद्योजक तथा ज्येष्ठ दत्त सांप्रदायी साधक गिरीश साठे यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी आर्थिक योगदान दिले.

        नगर रस्त्यावरील वैशंपायन नगरमधील श्रीदत्त देवस्थान नजीकच्या दादाजी प्रसादालय प्रांगणात साथरोग नियंत्रण कायदा नियमांचे तंतोतंत पालन करून हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ' गुरुदत्त ' संस्थेकडून मिळालेली किराणा मालाची छोटीशी भेट गरिबांचा सण गोड करणारी ठरली.

     यावेळी संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, हनुमानप्रसाद उर्फ बाबुशेठ जोशी, पी.बी शिंदे, ओमप्रकाश बाहेती, जगन्नाथ गोसावी, निलेश रोकडे, डॉ.अमोल फडके आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कु. मधुरा फडके हिने केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या