लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर:'मराठा आरक्षणासंबंधी सर्वोच्च
न्यायालयाने दिलेला निकाल ऐकून माझ्यासह सर्वांनाच वाइट वाटले. मात्र, न्यायालयाच्या निकालावर अधिक बोलता येणार नाही. त्यापेक्षा आता सरकार आणि
विरोधी पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन राज्यस्तरावर युवा वर्गाला शिक्षण आणि
नोकरीसंबंधी दिलासा देणारा निर्णय घ्यावा,' अशी प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
नगरमध्ये
बोलताना पवार म्हणाले, 'या निकालाचा आपण अद्याप अभ्यास केला नाही. मात्र, पन्नास
टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, असून म्हणून
न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधात निकाल दिल्याचे समजले आहे. हा निकाल ऐकून
आशावादी असलेल्या माझ्यासह सर्वांनाच वाईट वाटले आहे. मात्र, शेवटी तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. तो मान्यच करावा लागले. मात्र,
आता यापुढे जाऊन राज्यपातळीवर राजकारण विरहित निर्णय घेण्याची वेळ
आली आहे,' असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
' सरकार आणि विरोधीपक्ष यांनी राजकारण
सोडून यासाठी एकत्र आले पाहिजे. यात कोणीही राजकारण करू नये. पूर्वीच्या सरकारने
जे वकील दिले होते, तेच या सरकारने कायम ठेवले होते. त्यांनी
योग्य पद्धतीने बाजूही मांडली आहे. आता राज्यातील युवा वर्गाला शिक्षण आणि
नोकरीसंबंधी कसा दिलासा देता येईल, याचा विचार करून तो
निर्णय घेतला पाहिजे. राज्यातील सरकार आणि नेते मंडळी असा विचार करतील असे मला
वाटते,' असेही पवार यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या