लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
आदित्य ठाकरे यांनी एका चॅनेलला मुलाखत देताना ही
माहिती दिली. मुंबईमध्ये करोना प्रतिबंधक लशींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या
दृष्टीने जागतिक पातळीवरून खरेदी करण्याची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई
महापालिकेला देण्यात आल्याचे आदित्य यांनी सांगितले. शहरातील लसीकरण वेगाने आणि
परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत यासंदर्भात चर्चा
केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ' सध्या करोना प्रतिंबधक लशींसाठी
स्मार्टफोनद्वारे संबंधित अॅपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती
नसलेले नागरिक तसेच जे कोविन अॅप वापरू शकत नाहीत अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या
मिळावी यासाठी एक पद्धती तयार करण्यावर आम्ही काम करत आहोत,' असेही ते म्हणाले.
ज्येष्ठांना
दिलासा
मुंबईची लशींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण
केंद्रे वाढविण्याचे आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण
केंद्र सुरू करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राइव्ह-इन लसीकरण
केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त
इक्बालसिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता
शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राइव्ह-इन लसीकरण मोहिमेमुळे
ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये
लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही महापालिकेने जारी केल्या आहेत.
राज्यातील इतर सर्व शहरांनीही ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे
सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राइव्ह-इन लसीकरण
मोहीम घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
0 टिप्पण्या