लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नाशिक :खरिपाच्या तोंडावर
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डाच्या
आवारात कडक नियमांचे पालन करून नाशवंत कृषिमालाचे व्यवहार ठराविक वेळेत पुन्हा
सुरू होण्याची घोषणा गुरुवारी बाजार समितीतर्फे करण्यात आली होती. याबाबतची माहिती
सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाली. मात्र, अपरिहार्य
कारणामुळे अंशत: व्यवहार सुरू करण्याचा हा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आला आहे.
याबाबत पुन्हा एकदा संबंधित प्रशासन व यंत्रणांशी समन्वय साधून योग्य तो निर्णय
घेतला जाणार आहे.
गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार
समितीचे व्यवहार अंशत: सुरू होण्याचे संदेश सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने
शुक्रवारी काही प्रमाणात शेतकरी नाशवंत कृषिमाल बाजार समितीच्या दिशेने आणण्याची
शक्यताही नाकारता येत नाही. नाशिक कृऊबाचे सभापती देवीदास पिंगळे यांनी पालकमंत्री
छगन भुजबळ, जिल्हाधिकारी
सूरज मांढरे, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्यासमवेत
गुरुवारी दुपारी चर्चा केली होती.
शेतकऱ्यांच्या नाशवंत कृषिमालाचे नुकसान होऊ नये,
यासाठी काही तोडगा काढता येईल का, यादृष्टीने
चर्चा करण्यात आली होती. मात्र , याबाबत आता अधिक अभ्यास
करून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
0 टिप्पण्या