शाई लावलेली व्यक्ती बाहेर फिरताना दिसली तर कठोर
कारवाई
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
सिंधुदुर्ग: सध्या करोना संसर्गाची परिस्थिती सर्वत्र भयावह असून
त्याच्या मुकाबल्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. वाढता करोना
प्रादुर्भाव पाहता होम आयसोलेशन आणि क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीच्या हातावर शिक्क्याऐवजी आता पोलिओ डोस घेतल्यानंतर तसेच
निवडणुकीत मतदान केल्यानंतर बोटावर जशी शाई लावली जाते तशी शाई लावली जाणार आहे.
अशी शाई लावलेली व्यक्ती बाहेर फिरताना दिसली तर अशा व्यक्तीवर गुन्हे दाखल करून
कठोर कारवाई केली जाईल. तशा सूचनाच जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत,
अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी
दिली.
होम आइसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या डाव्या हाताच्या
बोटाला तर होम क्वारंटाइन असलेल्या
व्यक्तीच्या उजव्या हाताच्या बोटावर शाई लावली जाणार आहे. अशी शाई लावलेली व्यक्ती
बाहेर फिरताना दिसली तर अशा व्यक्तीची माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी. अशा
व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री उदय सामंत यानी स्पष्ट केले. ५ मे पासून पुन्हा माझे
कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गाव समित्या पुन्हा
कार्यान्वित करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
0 टिप्पण्या