Ticker

6/Breaking/ticker-posts

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचा तृणमूल १६२ जागासह आघाडीवर

 पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक २०२१ निकाल








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये मतदारांनी कुणाला कौल दिलाय, हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८.०० वाजता मतमोजणीला झालीय. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत झालेल्या मतदानामुळे इतर राज्यांपेक्षा या राज्यात निकाल जाहीर होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांपैंकी २९२ जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर दोन ठिकाणी मतदान रद्द करण्यात आलं होतं. या ठिकाणी फेरनिवडणूक घेण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या पक्षांना बहुमत मिळवण्यासाठी १४८ चा आकडा पार करावा लागणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची सगळी तयारी पूर्ण झालीय.

पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होतोय. मतदानानंतर समोर आलेल्या जनमत चाचणीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीचा सामना रंगणार असल्याचं दिसून आलं. पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान पार पडलं. बंगालमध्ये २७ मार्च, , , १०, १७, २२ आणि २६ एप्रिल रोजी नागरिकांनी आपलं मत नोंदवलंय.

Total Seats : 292

Majority Mark : 147

 

PARTY            LEADS+WINS

TMC                                                162

 

BJP                         89

                         

CPM   0

INC            5

OTH   1

 

 

 

·        नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आघाडीवर आहेत तर भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत

·        सकाळी ९.३० वाजता तृणमूल १०७ जागांवर तर भाजप १०१ जागांवर आघाडीवर

·        मतमोजणीत सुरुवातीला हाती आलेल्या कलानुसार तृणमूल काँग्रेस आघाडीवर

·        पश्चिम बंगालमध्येसकाळी ८.०० वाजता मतमोजणीला सुरुवात

·         

*आसाममध्ये भाजप ६ तर आसाम गण परिषद २ जागांवर आघाडीवर

·        *नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आघाडीवर आहेत तर भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत

·        *सकाळी ९.३० वाजता तृणमूल १०७ जागांवर तर भाजप १०१ जागांवर आघाडीवर

·        *पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस तर तामिळनाडूत डीएमके आघाडीवर

·        *केरळ : लुडुक्कीमधील मतमोजणीचं दृश्यं... प्रथम बॅलेट पेपरची मतमोजणी पार पडलेय

·        *आसाम : आसाम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दोन दिब्रुगडच्या दोन ठिकाणांवर पार पडणार आहे. दिब्रुगड *शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय व उपायुक्त कार्यालय इथे ही मतमोजणी होतेय.

·        *पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुच्चेरी आणि तामिळनाडूमध्ये सकाळी ८.०० वाजता मतमोजणीला सुरुवात

·        *केरळ : कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी पुथुपल्ली चर्चमध्ये प्रार्थना केली. ओमान चंडी हे *पुथुपल्ली विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आहेत.

·        *तामिळनाडू : तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत. बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक

·        *केरळ : केरळ विधानसभेत एकूण १४० जागा आहेत. बहुमतासाठी ७१ जागा आवश्यक

·        *आसाम : आसाम विधानसभेत एकूण १२६ जागा आहेत. बहुमतासाठी ६४ जागा आवश्यक

·        *पुदुच्चेरी : पुदुच्चेरीत एकूण ३० जागांवर मतदान पार पडलंय. (तसंच तीन नामित सदस्य) आहेत. पुदुच्चेरीत बहुमतासाठी १७ जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे.

·        *पश्चिम बंगालचा निकाल हा भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरतेय.

·        *राज्यातील निवडणुकीसाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक जनसभांना संबोधित केलं. तसंच करोना संक्रमण काळातही रस्त्यांवर रॅली आयोजित करण्यात आल्या होत्या.

*तर दुसरीडे राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही ही निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचं रान केलं. एका रॅलीदरम्यान जखमी झाल्यानंतरही व्हीलचेअरवर बसून ममता बॅनर्जी यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या