Ticker

6/Breaking/ticker-posts

निवृत्त मुख्याध्यापक, दत्तभक्त विष्णू दौंड गुरुजी यांचे दुःखद निधन

 











लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव :-येथील वैशंपायन नगरमधील श्रीदत्त देवस्थानचे श्रद्धावान साधक, नि:सीम दत्तभक्त आणि माजी मुख्याध्यापक विष्णू आश्रुबा दौंड गुरुजी (वय ७१) यांचे काल शुक्रवारी (दिं.३० रोजी) रात्री दुःखद निधन झाले. शेवगावच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रथितयश अस्थिरोगतज्ञ डॉ.सतीश दौंड यांचे ते वडील होत.अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

     मूळचे कोनोशी (ता. शेवगाव) येथील रहिवासी असलेले स्वर्गीय दौंड गुरुजी शेवगावी स्थायिक होते. जोहरापुर प्राथमिक शाळेतून ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. सध्या ते शेवगाव तालुका पेन्शनर असोसिएशनचे सरचिटणीस होते. वैकुंठवाशी प.पू.भगवानबाबा व योगतज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन यांचेवर त्यांची अपार श्रद्धा होती.

     निवृत्तीनंतर त्यांनी आपला सर्वाधिक वेळ शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानात मंत्रजप, ध्यानधारणा व दैनंदिन पूजाअर्चेत व्यथीत केला. श्रीदत्त देवस्थान ते श्रीक्षेत्र गाणगापूर " योगानंद चंदन पादुका " पायी दिंडी पालखी सोहळ्यात ते तब्बल ९ वर्ष सहभागी झाले. त्यांनी पत्नीसह गिरणार परिक्रमा तसेच चारधाम यात्रा पूर्ण केलेली आहे. दत्त देवस्थानने गेल्या वर्षी (दिं.९ मे २०२०) संकल्प केलेल्या " दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा "या दीड कोटीच्या मंत्रजपात त्यांचा सक्रिय सहभाग होता. गुरुवार (दिं २९ एप्रिल) अखेर ९ लाख ६८ हजार ८३५ इतक्या विक्रमी जपाची नोंद त्यांच्या नावावर आहे.

     मितभाषी व परोपकारी वृत्तीचे दौंड गुरुजी दान धर्मातही सतत पुढे असायचे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे निधनाने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच दत्त सांप्रदायी साधक परिवारात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या