लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्लीः सध्या
टेलिकॉम ऑपरेटर्स आपल्या ग्राहकांना स्वस्त प्लान देण्यासाठी स्पर्धा करीत आहेत.
त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी तुम्हाला स्वस्त आणि खास प्लान संबंधी माहिती देत
आहोत. तसेच Relience Jio आणि VI चे रोज ४ जीबी पर्यंत
मिळणाऱ्या डेटाची तुलना केली आहे. जाणून घ्या डिटेल्स.
Reliance Jio चे कमी
किंमतीतील प्रीपेड प्लान्स
रिलायन्स जिओ कॅटेगरीत केवळ दो प्लान्स
असे आहेत. पहिला प्लान १४९ रुपयांचा आहे.
या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉल, डेली १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस रोज मिळते. या प्लानची वैधता २४ दिवसांची
आहे. Reliance Jio चा
दुसरा प्लान १९९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानची
वैधता २८ दिवसाची आहे. या प्लान सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते.
दोन्ही प्लानमद्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. यात ioTV, JioSecurity, JioCinema, JioNews आणि
JioCloud चा समावेश आहे.
Airtel
चे कमी किंमतीतील प्रीपेड प्लान्स
कमी किंमतीत एअरटेलचे प्रीपेड प्लान्स ऑफर
करीत आहे. यात १९ रुपये, १२९
रुपये, १७९ रुपये आणि १९९ रुपयांचा प्लान्सचा समावेश आहे.
सर्वात स्वस्त प्लान १९ रुपयांचा आहे. यात २०० एमबी डेटा युजर्संना २ दिवसांसाठी
मिळतो. १२९ रुपयांच्या प्लानमध्ये १ जीबी डेटा २४ दिवसांसाठी मिळतो. याशिवाय,
अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जाते. तर १४९ रुपयांच्या
प्लानमध्ये सब बेनिफिट सोबत २ जीबी डेटा २८ दिवसांसाठी दिला जातो.
वोडाफोनचे ६९९ रुपयांचे प्लान
वोडाफोन आयडियाचा ६९९ रुपयांचा प्लान
बेस्ट आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. प्लानमध्ये रोज ४ जीबी डेटा मिळतो.
म्हणजेच वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये एकूण ३३६ जीबी डेटा युजर्संना दिला
जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. शिवाय, Binge All Night (रात्री १२ वाजेपासून
सकाळी ६ वाजेपर्यंत) फ्री अनलिमिटेड डेटा मिळतो.
जिओचा ९९९ रुपयांचा प्लान
यात एकूण २५२ जीबी डेटा ८४ दिवसांसाठी
मिळतो. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटाचा दिला जातो. जिओच्या या प्लानमध्ये एकूण
२५२ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली
जाते. युजर्संना रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे
फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.
0 टिप्पण्या