*Redmi Note 10 Pro स्मार्टफोन स्वस्त
*फोनच्या किंमतीत कंपनीकडून
२ हजारांची कपात
*फोनमध्ये दमदार बॅटरी, 64MP क्वॉड कॅमेरा
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
Redmi Note 10 Pro ची नवीन किंमत
रेडमीने Note 10 Pro च्या तिन्ही व्हेरियंटच्या किंमतीत २ हजार
रुपयांची कपात केली आहे. Redmi Note 10 Pro चे 6GB +
64GB व्हेरियंट आता १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. याच्या 6GB
रॅम + 128GB स्टोरेजच्या फोनला १६ हजार ९९९
रुपयात आणि 8GB + 128GB स्टोरेजच्या फोनला १८ हजार ९९९
रुपयात खरेदी करू शकता. या फोनला Dark Night, Glacial Blue आणि
Vintage Bronze कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
Redmi Note 10 Proचे फीचर्स
या फोनमध्ये ६.६ इंचाचा सुपर अमोलेड FHD+ डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट
120Hz आहे. हा फोन MIUI 12 वर आधारित
अँड्राइड 11 वर काम करतो. या फोनमध्ये २.३ गीगाहर्ट्ज पर्यंत
क्लॉक स्पीड सोबत 8nm प्रोसेस आणि ऑक्टा कोर क्वॉलकॉम
स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी
यात 5020 एमएएचची बॅटरी दिली आहे. ३३ वॉटचे फास्ट चार्जर
सपोर्ट दिले आहे.
फोटोग्राफीसाठी Redmi Note 10 Pro मध्ये LED फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर ६४
मेगापिक्सलचा दिला आहे. तर दुसरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल दिला आहे.
तिसरा ५ मेगापिक्सलचा टेलिमायक्रो आणि चौथा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.
सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे.
0 टिप्पण्या