Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरमध्ये हनी ट्रॅपचं सत्र सुरुच, क्लास वन अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडीओ काढून 3 कोटी मागितले

 




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

 अहमदनगर : अहमदनगर आणखी एक हनी ट्रॅप उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. क्लास वन अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ तयार करुन 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश

दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याने हनी ट्रॅप प्रकरणात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर आणखी एक हनी ट्रॅप उघडकीस आला आहे. अहमदनगरमधील जखणगाव येथे उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडीओ तयार करुन तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी अहमदनगर तालुका पोलिस ठाण्यात एक महिला आणि 4 पुरुष अशा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित महिलेने अशा प्रकारे आणखी काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करत हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी वसुली केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

 

बिझनेसमनच्या हनी ट्रॅपचाही भांडाफोड

नुकतंच एका श्रीमंत व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून, त्याचा अश्लील व्हिडिओ काढण्यात आला होता. व्यावसायिकाकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदाराला नगर तालुका पोलिसांनी शनिवारी जेरबंद केलं होतं. अमोल सुरेश मोरे असे अटक केलेल्या सदर महिलेच्या साथीदाराचे नाव आहे.

 

आरोपींनी जवळपास साडेपाच लाखांचा मुद्देमाल हिसकावला

आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराने पीडित व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्याकडील 5 तोळे वजनाची सोन्याची चेन, चार अंगठ्या आणि 84 हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली होती. महिला आणि तिच्या साथीदाराने आतापर्यंत एकूण 5 लाख 44 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला होता. या प्रकरणी तालुका पोलीस पुढील तपास करत आहे.

हनी ट्रॅप म्हणजे काय?

एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. (विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवण्यात आलं होतं. हाही पुराणातला हनी ट्रॅपच) गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानलं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या