*यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर
*२ मे पासून होणार होती परीक्षा
*करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
*एनटीएने जारी केले परिपत्रक
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्लीः - NTA UGC
NET Exam 2021 postponed: करोना संक्रमणामुळे आता विद्यापीठ
अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET) देखील
स्थगित करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ने
मंगळवार, २० एप्रिल २०२१ रोजी यासंबंधी परिपत्रक जारी केले
आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी टि्वट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.
एनटीएने सांगितले की डिसेंबर 2020 सत्रासाठी युजीसी नेट परीक्षा (UGC NET Dec 2020
Exam) २ मे ते १७ मे २०२१ या कालावधीत संगणकआधारित पद्धतीने होणार
होती. पण करोना महामारीची वर्तमान परिस्थिति आणि उमेदवारांचे आरोग्य ध्यानात घेऊन
ही परीक्षा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे.
ही परीक्षा आता आता कधी होणार, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
एनटीएने सांगितले की परीक्षेच्या तारखेच्या १५ दिवस आधी उमेदवारांनी परीक्षेच्या
सुधारित वेळापत्रकाबाबतची माहिती देण्यात येईल. या दरम्यान उमेदवारांना सल्ला
देण्यात आला आहे की त्यांनी एनटीए आणि यूजीसी नेटची अधिकृत वेबसाइट अद्ययावत
माहितीसाठी नियमितपणे पाहावी.
यूजीसी नेट डिसेंबर २०२० परीक्षा (मे २०२१) संबंधी
कोणतीही माहिती आणि स्पष्टीकरणासाठी उमेदवार एनटीएचा हेल्पलाइन नंबर ०११-४०७५९०००
वर संपर्क करू शकतात. याव्यतिरिक्त उमेदवार ugcnet@nta.ac.in
वर ईमेल पाठवून संपर्क करू शकतात.
0 टिप्पण्या