तब्बल ५,२३७ पदांसाठी भरती
sbi.co.in वर
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अर्ज प्रक्रिया १७ मे २०२१ पर्यंत सुरु
राहणार आहे. नोटिफिकेशन नुसार उमेदवार केवळ एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज
करण्याआधी हे सुनिश्चित करा की ज्या राज्यातील पदांसाठी तुम्ही अर्ज करत आहात, त्या राज्यातील स्थानिक भाषेचे तुम्हाला
पूर्ण ज्ञान आहे, म्हणजेच तुम्हाला ती भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येते.
महत्वपूर्ण तारखा
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची
तारीख - २७ एप्रिल २०२१
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत - १७ मे २०२१
प्री एक्झाम ट्रेनिंग कॉल लेटर - २६ मे
२०२१
प्रीलिम्स एक्झाम डेट - जून २०२१
मेन एक्झाम - ३१ जुलै २०२१
पात्रता
कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ
किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयातील पदवी असणे अनिवार्य. जे
विद्यार्थी आता अंतिम वर्षाला आहेत, मात्र अजून अंतिम परीक्षा झालेली नाही, ते देखील
अर्ज करू शकतात. मात्र त्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र १६ ऑगस्ट २०२१ पूर्वी
मिळायला हवे.
वयोमर्यादा
२० ते २८ वर्षे. उमेदवारांचा जन्म २
एप्रिल १९९३ पूर्वी आणि १ एप्रिल २००१ नंतरचा नसावा. वयाची गणना १६ ऑगस्ट २०२१ या
तारखेनुसार होईल.
वेतन - १७,९०० रुपये - ४७,९२० रुपये. बेसिक पे
१९,९०० रुपये.
निवड प्रक्रिया
सर्वात आधी ऑनलाइन पूर्व परीक्षा घेतली
जाईल. यात उत्तीर्ण होणारे उमेदवार ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.
पूर्व परीक्षा एक तास कालावधीची असेल. यात
इंग्रजी भाषा, संख्यात्मक
योग्यता आणि तार्किक क्षमतेशी संबंधित एकूण १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. पूर्व
परीक्षा १०० गुणांची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा
होईल.
अर्ज शुल्क
सामान्य, ईडब्ल्यूएस, ओबीसी - ७५० रुपये
एससी,
एसटी, दिव्यांग प्रवर्ग - नि:शुल्क
0 टिप्पण्या