Ticker

6/Breaking/ticker-posts

Reliance Jio: १० जीबीपर्यंत एक्स्ट्रा डेटा, फ्री कॉलिंग आणि OTT सब्सक्रिप्शन, टॉप ३ प्लान

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः रिलायन्स जिओचा आपल्या युजर्संसाठी बेस्ट बेनिफिटचे प्लान्सची मोठी लिस्ट ऑफर करीत आहे. या प्लान्स मध्ये कंपनी जबरदस्त डेली डेटा सोबत १० जीबी पर्यंत एक्स्ट्रा डेटा देत आहे. प्लान्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात फ्री कॉलिंग, फ्री एसएमएस सोबत अनेक अतिरिक्त बेनिफिट् दिले जात आहे. ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन याचा समावेश आहे.

रिलायन्स जिओचा ४०१ रुपयांचा प्लान
२९ दिवसांची वैधते सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा सोबत ६ जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण ९० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत १०० फ्री एसएमएस देत आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य बेनिफिट्समध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

रिलायन्स जिओचा ७७७ रुपयाचा प्लान

या प्लानमध्ये कंपनी रोज १.५ जीबी डेटा सोबत एक्स्ट्रा ५ जीबी डेटा ऑफर करते. ८४ दिवसांची वैधता सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. प्लानमध्ये कंपनी जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस सोबत डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे.

रिलायन्स जिओचा २५९९ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा सोबत १० जीबी एक्स्ट्रा डेटा सुद्धा ऑफर करते. या प्लानमध्ये मिळणारा एकूण डेटा ७४० जीबी आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट मध्ये डिज्नी प्लस हॉट्स्टार आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या