लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : 1
एप्रिलपासून 2021-22 आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. नवीन आर्थिक
वर्षात बर्याच नियमांमध्ये बदल झाला आहे, त्याचा थेट परिणाम
तुमच्या गुंतवणुकीवर आणि आर्थिक स्थितीवर होईल. पोस्ट ऑफिसने ठेव आणि पैसे
काढण्याच्या नियमातही मोठे बदल केले आहेत. पैसे काढण्याचे नियम आणि पैसे काढण्याची
मर्यादा आता निश्चित करण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा जास्तीचे पैसे काढणे आणि
ठेवींसाठी प्रत्येक व्यवहारासाठी शुल्क वजा केले जाईल. तुम्हाला 1 एप्रिलपासून लागू असलेल्या नवीन नियमांबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली
आहे.
तुमच्याकडे
पोस्ट ऑफिसमध्ये मूलभूत बचत खाते असल्यास, दरमहा पैसे काढणे
चार वेळा मोफत आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावरील शुल्क म्हणून किमान 25 रुपये किंवा मूल्याच्या 0.50 टक्के कपात केली जाईल.
मूलभूत बचत खात्यात जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तुमच्याकडे
बचत असल्यास (मूलभूत बचत खाते वगळता) किंवा चालू खाते असल्यास एका महिन्यात 25000
हजारांपर्यंत पैसे काढणे मोफत आहे.
मर्यादा
ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 0.50
टक्के मूल्य किंवा किमान 25 रुपये द्यावे
लागतील. चालू खात्यात जमा करण्याचीही मर्यादा आहे. या खात्यात दरमहा 10 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. त्याहून अधिक रक्कम जमा करण्यासाठी 0.50
टक्के मूल्याचे किंवा किमान 25 रुपये व्यवहार
शुल्क म्हणून द्यावे लागतील.
0 टिप्पण्या