लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
)
नवी दिल्ली :-Oppo कंपनीने या फोनच्या ५ जी व्हेरियंट (Oppo A74 5G) ला मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे. स्मार्टफोनच्या ४ जी व्हेरियंटला कंपनीने आता फिलिपिन्स आणि कंबोडिया मध्ये लाँच केले आहे. याच्या ५जी व्हेरियंटला आता थायलँड मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. जाणून घ्या डिटेल्स काही खास वैशिष्ट्ये.
ओप्पो A74 चे फीचर
फोनच्या 4G आणि 5G वेरियंट मध्ये मोठे बेजल आणि पंच होल
डिजाइनचा डिस्प्ले दिला आहे. ४जी व्हेरियंटमध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड
डिस्प्ले 60Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. याच्या ५जी
व्हेरियंट मध्ये ६.४३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. परंतु, हा
एक एलसीडी पॅनेल आहे. यात 90Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे.
फोनच्या ४ जी व्हेरियंटमध्ये कंपनी या डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर ऑफर करीत आहे.
तर याच्या ५जी व्हेरियंटमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
फोटोग्राफीसाठी ओप्पो A74 4G मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल
रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक २
मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. फोनच्या
५जी व्हेरियंटमध्ये ८ मेगापिक्सलचा एक अल्ट्रा वाइड लेन्स एक्स्ट्रा दिला आहे.
सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या ओप्पो A74 4G मध्ये स्नॅपड्रॅगन 662 आणि 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर दिला आहे. ओएस म्हणून या दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड Color OS 11.1 वर काम करतो. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. परंतु, फोनच्या ४जी व्हेरियंट मध्ये ३३ वॉट आणि ५ जी व्हेरियंट मध्ये १८ वॉटची फास्ट चार्जिंग दिली आहे. फिलिपिन्स मध्ये ४ जी व्हेरियंटची किंमत भारतीय रुपयांमध्ये १८ हजार रुपये आणि थायलँडमध्ये ५ जी व्हेरियंटची किंमत भारतीय रुपयांमध्ये जवळपास २१ हजार रुपये आहे.
0 टिप्पण्या