Ticker

6/Breaking/ticker-posts

CA Foundation : सीए फाउंडेशन जून परीक्षेसाठी नोंदणी सुरू

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः  CA Foundation June Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया  ने CA Foundation June Exam 2021 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार फाउंडेशन कोर्स परीक्षासाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी, ICAI च्या अधिकृत साइट icaiexam.itai.org वर ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ४ मे २०२१ पर्यंत आहे.


इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, सीए फाउंडेशन परीक्षेसाठी विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ७ मे २०२१ आहे. सीए फाउंडेशन १ परीक्षा २४ जून २०२१ रोजी सुरू होईल आणि २० जून २०२१ रोजी संपेल. पेपर १ ची परीक्षेची वेळ दुपारच्या सत्रात, दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. या व्यतिरिक्त पेपर ३ आणि ४ परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असतील.

CA Foundation June Exam 2021: सीए फाउंडेशन जून परीक्षेसाठी कसा कराल अर्ज -

सीए फाउंडेशन जून परीक्षेसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जावे. यानंतर होमपेज वर, 'लॉगिन / रजिस्टर' टॅब वर क्लिक करा, रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक तपशील भरा. यानंतर आपला रजिस्टर्ड आयडी आणि पासवर्डचा उपयोग करून लॉग इन करा. यानंतर अर्ज शुल्काचे पैसे भरा आणि सीए फाउंडेशन परीक्षा फॉर्म जमा करा. फॉर्मचे प्रिंटआउट घेऊन भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवा.

भारतीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १५०० रुपये आहे. तर परदेशी केंद्रांसाठी यूएस उमेदवारांसाठी ३२५ डॉलर द्यावे लागतील. याव्यतिरिक्त काठमांडू (नेपाळ) केंद्रात उमेदवारांना २,२०० रुपये शुल्क जमा करावे लागेल. ६०० रुपये विलंब शुल्क द्यावे लागेल. सीए फाउंडेशन जून परीक्षेसाठी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या