Ticker

6/Breaking/ticker-posts

धक्कादायक ! वाघ्याला बांधून मुरळीवर सामुहिक बलात्कार, दोघे जेरबंद एक फरार..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 अहमदनगर:-जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या आष्टी तालुक्यातील वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना नगरजवळच्या निबोंडी गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे. नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात शुक्रवारी रात्री ही घटना घडली.


आष्टी तालुक्यातील ही महिला जागरण गोंधळात मुरळीचे काम करते. नगरला एका कार्यक्रमासाठी ती आपल्या सहकाऱ्यासह आली होती. येथील कार्यक्रम आटोपून ते घराकडे दुचाकीवरून परत जात होते. रस्त्यात निंबोडी शिवारात लघुशंकेसाठी ते थांबले. तेव्हा तेथे तिघे जण आले. त्यांनी दोघांना बळजबरीने ओढून जवळच्या शेतात नेले. महिलेसोबतच्या सहकाऱ्याला पकडून ठेवून तिघांनी महिलेवर बलात्कार केला. त्यांच्याकडील नऊ हजार रुपये काढून घेऊन आरोपी पळून गेले. तिन्ही आरोपी शेतात काम करणारे मजूर आहेत.

त्यानंतर महिलेने भिंगार कँप पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अक्षय कचरू माळी (रा. निंबोडी, ता. नगर) व आकाश पोटे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी नीलेश पोटे फरार आहे.
या घटनेची माहिती मिळताच भिंगार कँप पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भय्यासहेब देशमुख यांनी तातडीने हाचचाली केल्या. सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली. तांत्रिक तपास करून आरोपींची माहिती आणि ठावठिकाणा मिळविला. काही वेळातच आरोपी माळी याला नगर शहरातून अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी पुण्याला पळून गेला होता. तेथून त्याला अटक करण्यात आली. आता तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

तांत्रिक पद्धतीने त्याचा ठावठिकाणी शोधला असून त्याच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यातील तिन्ही आरोपी शेतात मजुरी काम करणारे आहेत. वाघ्या-मुरळी तेथून जात असताना ते शेतातच होते. त्या दोघांच्या असहायतेचा गैरफायदा उठवत आरोपींनी हे कृत्य केले. दोघांना तातडीने अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचाही ठावठिकाणा लागला असून त्यालाही लवकरच अटक होईल, असे तपास अधिकारी देशमुख यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या