Ticker

6/Breaking/ticker-posts

पंकजाताई मुंडे कोरोनाच्या विळख्यात

 

लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई :भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुंडे कुटुंबात शिरला आहे. पंकजाताई मुंडेंना यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे



गेल्या ४ ते ५ दिवसांपासून त्यांनी स्वत:ला  क्वॉरंटाईन करुन घेतलं होतं. आज त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, की “माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, मी अगोदरच घरामध्ये स्वतःला विलगीकरण करून घेतलं होत. मी काही दिवसांपूर्वी कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी घेतल्या होत्या. तेव्हा लोकांच्या संपर्कात आले होते. माझ्या समवेत दौऱ्यात असणाऱ्या लोकांनी कोरोना टेस्ट करून काळजी घ्यावी.” असं ट्विट पंकजाताईनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या