लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: राज्यात एकीकडे करोनाचा संसर्ग झपाट्याने
वाढत असताना, दुसरीकडे लशींचा तुटवडाही निर्माण झाल्याचे
चित्र आहे. अशात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांच्यावर त्यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लस घेतल्यावरून सोशल मिडियावर निशाणा साधला जात आहे.
संपूर्ण देशात सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात असताना ४५ वर्षांपेक्षा
कमी वय असलेला तन्मय फडणवीस लस घेतो कसा, असा सवाल लोक
विचारू लागले आहेत. तन्मय फडणवीस याने दुसऱ्यांदा लस घेतली आहे.
तन्मय हा कलाकार आहे आणि त्याचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी
असतानाही त्याने लस घेतली, असे म्हणत ही वशिलेवाजी नाही का,
असा सवाल या नेटकऱ्याने विचारला आहे. तन्मय हा बॉलिवूड माफियांचाच
एक भाग नाही का?... मग आता फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी
तुम्ही राज्यपाल आणि पंतप्रधानांची भेट घेणार का?, असे एकावर
एक प्रश्नही त्याने विचारले आहेत.
आपल्याला देवेंद्र फडणवीस व तन्मय फडणवीस यांना धन्यवाद दिले
पाहिजेत, कारण त्यांच्यामुळे केंद्र
सरकारला आज १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा निर्णय घ्यावा लागला, असा टोलाही एका नेटकऱ्याने लगावला आहे.
0 टिप्पण्या