10 बाधित रुग्ण आढळले
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
चिचोंडी पाटील : -राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.नगर तालुक्यातील उक्कडगाव येथे मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते.त्या पार्श्वभूमीवर मंगळवार. 20 रोजी उक्कडगाव येथे मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या नियोजनातून कोव्हिड रॅपिड टेस्ट कॅम्प घेण्यात आला.
( उक्कडगाव ता. नगर येथे मा.सभापती प्रवीण कोकाटे यांच्या नियोजनातून कोव्हिड रॅपिड टेस्ट कॅम्प घेण्यात आला. (छाया : सोहेल मनियार)
या ठिकाणी एकूण ६१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मध्ये बाधीत रुग्ण संख्या १० आढळून आली. ५१ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.पंचायत समिती नगरचे माजी सभापती प्रवीण कोकाटे म्हणाले की राज्यात कोरोनचा प्रादुर्भाव वाढत चालला असून ग्रामीण भागही याला अपवाद राहिलेले नाही.त्यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. मास्क व सॅनिटायझर वापरावे.संपर्कात येऊ नये. सामाजिक अंतर राखावे.सर्वांनी घरातच राहून शासनाने घालून दिलेले लॉकडाऊनचे नियम पाळावेत असे आवाहन नगर तालुका पंचायत समितीचे मा. सभापती प्रवीण कोकाटे यांनी केले.
कॅम्प यशस्वी होण्यासाठी मा.सभापती प्रविण कोकाटे, सरपंच नवनाथ म्हस्के, CHO डाॅ.पूनम भोजने, रवि म्हस्के,बाळासाहेब तिपोळे, प्रकाश शेळके, पं.सं.नगरचे आरोग्य कर्मचारी यांनी प्रयत्न केले.रुग्णांना पुढील उपचारासाठी चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.अशी माहिती मा. सभापती प्रवीण कोकाटे यांनी दिली. उक्कडगाव येथे कोव्हिड रॅपिड टेस्ट कॅम्प घेऊन तपासणी केल्याबद्दल ग्रामस्थांनी पंचायत समिती नगरचे मा.सभापती प्रवीण कोकाटे यांचे आभार मानले.
0 टिप्पण्या