लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण
कसे करायचे, असा प्रश्न पडलेल्या भारताच्यादृष्टीने एक
दिलासादायक बाब समोर आली आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्या लोकांना कोरोना लसीकरणाची दोन मात्रा देण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी लसीचा केवळ
एकच डोस पुरेसा आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संशोधनातून
पुढे आली आहे. पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीने यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध
केला आहे.
त्यामुळे आता भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात कोरोना लसीकरणाची
रणनीती बदलली जाणार का, हे पाहावे लागेल. देशातील करोना परिस्थिती
दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांसह स्वतंत्र पदभार असलेले आणि
राज्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत
विविध राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपलब्ध
बेड, ऑक्सिजनची स्थिती, लसीकरणाची
प्रगती आणि औषधींचा साठा या मुद्द्यावर चर्चा केली जाणार असल्याचे समजते. तसेच या
बैठकीत कोरोना लसीकरणासंदर्भात काही नवी रणनीती ठरवली जाणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या