Ticker

6/Breaking/ticker-posts

गांधी परिवाराबरोबर मी कायम असणार आहे : राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे

 पंकजा मुंडे यांनी आज केले गांधी परिवाराचे सांत्वन




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :– भाजपाचे जेष्ठनेते दिलीप गांधी यांच्यासारखे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आता आपल्यात नसल्याचे मोठे दु:ख होत आहे. नगरमध्ये आल्यावर त्यांच्याकडून होणारे आदरतिथ्य कायम स्मरणात राहील. ऑक्टोबर महिन्यात दसरा मेळावा आटपुन मी नगरमार्गे पुण्याला जाताना दिलीप गांधी यांची झालेली माझी शेवटची भेट. आज ते नसले तरी मी गांधी परिवाराबरोबर कायम असणार आहे, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे यांनी स्व.दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

 

पंकजा मुंडे यांनी आज स्व. दिलीप गांधी यांच्या कुटूबियांचे घरी जाऊन सांत्वन केले. श्रीमती सरोज गांधी, सुवेंद्र व देवेंद्र गांधी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी स्व. गांधी यांच्या अनेक जुन्या घटना व कार्यक्रमांच्या आठवणींना पंकज मुंडे यांनी उजाळा दिला.

 

यावेळी खा.सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह युवराज पोटे, दिलीप भालसिंग आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या