लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
)
नगर:- रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुमातील जुन्या हातबॉम्बचा स्फोट होऊ
दोघे किरकोळ जखमी झाले. नगर तालुक्यातील नारायण डोहो होगावात
एका वस्तीवर ही घटना घडली आहे. खोदून आणलेल्या मुरूमासोबत जुना हातबॉम्ब तेथे आला
असल्याचा अंदाज आहे. तो फोडत असताना त्याचा स्फोट झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तेथे
जाऊन पाहणी केली. मात्र, आणखी
स्फोटके तेथे आढळून आली नाहीत. नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात बाबासाहेब
रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. या
मुरुमात पिन असणारा जुन्या काळातील हात बॉम्ब आढळून आला. शेतात गवत काढण्यासाठी
आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना तो बॉम्ब गोळा दिसला. त्यांनी तो जवळच
शेतात काम करत असलेल्या अक्षय साहेबराव मांडे या युवकाकडे दिला. त्याने तो जमीनीवर
आपटला. यावेळी त्याचा मोठा स्फोट झाला.
यात अक्षय व मंदाबाई
फुंदे दोघेही जखमी झाले. दूरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला. त्यामुळे ग्रामस्थ जमा
झाले. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र सानप
यांनी पथकासह भेट दिली. यानंतर घटनास्थळाची बॉम्ब शोधक व नाशक पथकाने पाहणी केली.
या परिसरात आणखी काही स्फोटके आहेत का, याची तपासणी बॉम्बशोधक पथकाने केली आहे. मात्र काहीही आढळून आले नाही.
जेथून मुरूम आणला, तेथेही पाहणी करण्यात आली. जुन्या
काळात हा जिवंत बॉम्ब मातीत गाडला गेला असावा. मुरूम खोदताना तो निघून मुरूमासोबत
रस्त्यावर टाकण्यात आला आसावा, असा अंदाज आहे. स्फोट फार
मोठा झाला नाही आणि त्यामध्ये जास्त धोदादायक रसायने नसल्याने जीवितहानी झाली नसल्याचे
सांगण्यात आले.
0 टिप्पण्या