लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
*😷 अहमदनगर कोरोना अपडेट 😷*
*आज १३१९ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या २२३३ बाधितांची रुग्ण संख्येत भर,*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२० टक्के.*
अहमदनगर : जिल्ह्यात आज १३१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९६ हजार ४९४ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२० टक्के इतके झाले आहे.
*दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत २२३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११६३७ इतकी झाली आहे.*
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये *८५९ रुग्ण.*
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत *५४९ रुग्ण.*
अँटीजेन चाचणीत *८२५ रुग्ण* बाधीत आढळले.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २७१, अकोले १०३, जामखेड ८, कर्जत ३७, कोपरगांव ६४, नगर ग्रामीण ३६, नेवासा १२, पारनेर ३८, पाथर्डी २९, राहता १०, राहुरी ७, संगमनेर १५१, शेवगांव २६, श्रीगोंदा २१, कॅंटोन्मेंट बोर्ड ३८, मिलिटरी हॉस्पिटल ६ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २०२, अकोले ९, जामखेड ३, कर्जत ४, कोपरगांव २९, नगर ग्रामीण ३९, नेवासा ५, पारनेर ८, पाथर्डी २२, राहाता ८४, राहुरी ७, संगमनेर ४४, शेवगांव २६, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर ४७, कॅंटोन्मेंट बोर्ड ४ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ८२५ जण बाधित आढळुन आले. मनपा १३८, अकोले १६, जामखेड ३६, कर्जत १६०, कोपरगांव ६, नगर ग्रामीण ११२, नेवासा ३८, पारनेर २४, पाथर्डी ६३, राहाता २३, राहुरी ९३, संगमनेर ३, शेवगांव ५१, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ३२, कॅन्टोन्मेंट बोर्ड १२ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा ३६२, अकोले ६३, जामखेड ३२, कर्जत ५०, कोपरगांव १४४, नगर ग्रामीण ५८, नेवासा १००, पारनेर २८, पाथर्डी ६५, राहाता ६३, राहुरी ५१, संगमनेर ६४, शेवगांव ५३, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर ९१, कॅन्टोन्मेंट ३९, मिलिटरी हॉस्पिटल २, इतर जिल्हा १९ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
* बरे झालेली रुग्ण संख्या : ९६४९४*
*उपचार सुरू असलेले रूग्ण : ११६३७*
*मृत्यू : १२७०*
एकूण रूग्ण संख्या : १,०९,४०१*
(स्त्रोत : नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा.*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या.*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.*
0 टिप्पण्या