( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
रायगड : कोण म्हणतं या जगात देवदूत नसतो?, याचा साक्षात प्रत्यय वांगणी रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला आहे येथे एक
लहान मुलगा आईच्या हातातून सुटून थेट रेल्वे ट्रॅकवर पडला आणि समोरुन भरधाव वेगाने
गाडी येत होती. ही आई जीवाच्या आकांताने मुलाला वाचवण्यासाठी ओरडत होती. तेव्हा
रेल्वेचा एक पॉईंटमन देवदूतासारखा धावून आला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता या
चिमुकल्याचे प्राण वाचवले .
नेमकं काय घडलं?
एक आंधळी आई 17 एप्रिलला सायंकाळी 5 वाजताच्या
सुमारास आपल्या मुलाला घेवून प्लॅटफॉर्मवरुन जात होती. तेवढ्यात तो मुलगा आईच्या
हातातून सुटून ट्रॅकवर पडला. त्या माऊलीला हे कळालं की आपला मुलगा ट्रॅकवर पडलाय,
पण काहीही दिसत नसल्याने तिला कळेना काय करावं, तेवढ्यात तिला ट्रेनचा आवाज आला. तेव्हा ही आई जीवाच्या आकांताने आपल्या
मुलाला वाचविण्यासाठी आरडाओरड करु लागली. याचवेळी विरुद्ध बाजुच्या प्लॅटफॉर्मवर
असलेल्या वागंणी स्टेशनवरील पॉईंटमन मयुर शेळके यांनी सर्व प्रकार पाहिला आणि
प्रसंगावधान राकत त्याने थेट ट्रॅकवर उडी घेतली.
0 टिप्पण्या