लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नागपूर:- ब्रुक
फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शनिवारी
रात्री मुंबई येथील पोलिस ठाण्याला भेट दिल्यानंतर सरकारी कामात हस्तक्षेप केल्या
प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होईल, असे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्याला
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी
प्रत्युत्तर दिले आहे. मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, २०
वर्षे विरोधी पक्षात राजकारण केले, जनतेसाठी ३६ केसेस अंगावर
घेतल्या, अशा कारवाईच्या इशाऱ्यांना भिक घालत नाही.
राज्याच्या हितासाठी कोणत्याही स्तरावरून जाऊन काम करण्याची तयारी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबईहून नागपूरला येताच मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना
फडणवीस म्हणाले, गृहमंत्री वळसे पाटील ‘मॅच्युअर्ड’ आहेत. कंपनीच्या संचालकास केवळ विरोधी
पक्षाने आवाहन केल्याने ‘स्टोरी’ रचून
पोलिस ठाण्यात नेले. आम्ही ठाण्यात गेल्यावर कुठलाही साठा नाही, आरोप नाही, गंभीर गुन्हा केला नसल्याचे पोलिसांनी
स्पष्ट केले. माझ्या चौकशीचा प्रश्न असल्यास अशा कुठल्याही चौकशीला घाबरत नाही.
चंद्रकांत
पाटील यांनी उडवली खिल्ली
देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाईचे संकेत राज्याचे गृहमंत्री
दिलीप वळसे पाटील यांनी दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी
खिल्ली उडवली आहे. आम्ही घाबरत नाही, खुशाल गुन्हा दाखल करा. अनिल देशमुखही धमक्या देत देत गेले, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत
होते. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानेच सर्व काही
केंद्र सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात
सत्ताधाऱ्यांनी असे राजकारण करणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले.
सत्ताधाऱ्यांनी आता रोज खोटे
आरोप करणे थांबवले पाहिजे, असे
म्हणत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुशाल गुन्हा दाखल करावा, आम्ही घाबरत नाही, असे म्हटले. माजी गृहमंत्री अनिल
देशमुखही अशाच धमक्या देत देतच गेले. दिलीप वळसे पाटील हे सौम्य वाटले होते. पण
इंजेक्शन दिल्यावर तेही पुढे जात असतात, असा टोला पाटील
यांनी लगावला.
0 टिप्पण्या