Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव तहसीलदार वाहनाचे चालक बाबा शेख कालवश

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव :   शेवगाव तहसीलदारांच्या शासकीय वाहनाचे चालक बाबा महमंद शेख (वय ३६) यांचे आज शुक्रवारी (दिं.२३)सकाळी साडेदहाच्या सुमारास नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. शेख यांच्या निधनाचे वृत्त समजताच तहसीलदार अर्चना पागिरे व निवासी नायब तहसीलदार मयुर बेरड यांनी नगरकडे धाव घेतली.

         गेल्या तीन वर्षापासून शेख यांचे खाजगी वाहन (MH 16 BZ 9605 ) शेवगाव तहसील कार्यालयाकडे कराराने होते तसेच ते स्वतः या गाडीवर चालक म्हणून कार्यरत होते. अजात शत्रू, कार्यतत्परता, नम्रता ही त्यांची गुणवैशिष्टे होत. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले.

    त्यांचे पश्चात आई वडील, दोन भाऊ, तीन बहिणी, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. मरहूम शेख यांचे अकाली निधनामुळे तहसील कार्यालय व तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तहसीलदार अर्चना पागिरे नगरच्या सिव्हिल रुग्णालयात पोहोचताच त्यांनी आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली. सच्चा सारथी गमावल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. शेख यांच्या कुटुंबियांना महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्थिक मदत केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळी मगरीद नमाजनंतर त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या