Ticker

6/Breaking/ticker-posts

अवघ्या १ मिनिटात या स्मार्टफोनची ३० हजार युनिटची विक्री, इतकी डिमांड का आहे, जाणून घ्या

 






*स्मार्टफोन Mi Mix Fold ला घसघशीत प्रतिसाद

*या फोनला चीनमध्ये करण्यात आले लाँच

*अवघ्या एका मिनिटात ३० हजार फोनची विक्री

लोकनेता न्यूज                  

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 नवी दिल्लीः स्मार्टफोन बनवणारी चीनी कंपनी शाओमीने नुकताच फोल्डेबल स्मार्टफोन Mi Mix Fold ची ३० हजार हून जास्त युनिट्सला अवघ्या १ मिनिटात विक्री केली आहे. जीएसएमएरिनाच्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली आहे. कंपनीने फक्त एका मिनिटात ३० हजार डिव्हाइसची विक्री केली आहे. ४० कोटी चीनी युआनची कमाई केली आहे.


या फोनमध्यटे ८.०१ इंचाचा डब्ल्यूक्यूएचडी (वाइड क्वॉड हाय डेफिनिशन) प्लस रिजॉल्यूशन फ्लेक्सिबल इंटरनल डिस्प्ले आणि फ्रंट स्क्रीन मध्ये ६.५२ इंचाचा एएमओलएलईडी डिस्प्ले दिला आहे. जो ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट, १८० हॉट्स टच सँपलिंग रेट आणि एचडी प्लस रिझॉल्यूशन देते. फोनला एक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर आणि ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी तसेच ६७ वॉट टर्बो चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

फोनमध्ये एक यू आकाराची डिझाइन दिली आहे. यासंबंधी कंपनीने दावा केला आहे.  Mi  Mix Fold ने Xiaomi च्या आधी फोल्डेबल फोनच्या रुपाने सुरूवात केली आहे. हा फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड Fold 2 आणि हुवावे मेट एक्स २ च्या फोनसोबत स्पर्धा करणार आहे. Mi Mix Fold C1  इमेज सिग्नल प्रोसेसर (ISP) आणि लिक्विड लेंस टेक्नोलॉजीचा शाओमीचा पहिला फोन आहे.


Mi Mix Fold फोनचे खास वैशिष्ट्ये
Mi Mix Fold वर पीक ब्राइटनेससाठी ९०० एनआयटी आणि ८.०१ इंचाचा डब्ल्यूक्यूपीचडी ओएलईडी डिस्प्ले दिला आहे. कवर साइटवर फोनमध्ये 840×2,520 पिक्सल रिजॉल्यूशन सोबत ६.५ इंचाचा AMOLED डिस्प्ले, Mi Mix Fold च्या इंटरनल स्क्रीन मध्ये 60Hz रिफ्रेश रेट आहे तर बाहेरच्या डिस्प्ले मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आहे. Mi Mix Fold  च्या डिस्प्लेमध्ये Dolby Vision आणि HDR10 + स्टँडर्ड साठी सपोर्टचा समावेस आहे. बाहेरच्या डिस्प्लेत HDR10 + सपोर्टचा समावेश आहे. हे 1440p फोटोज आणि व्हिडियो च्या रिजॉल्यूशनाल दुप्पट करण्यात सक्षम आहे.

Mi Mix Fold  मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, लिक्विड लेन्स टेक्नोलॉजी सोबत ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर सोबत अल्ट्रा वाइड अँगल लेन्स सोबत १३ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फ्रंट मध्ये २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. Xiaomi  ने  Mi Mix Fold वर डुअल सेल 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. जी ६७ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. हा फोन फक्त ३७ मिनिटात पू्र्ण चार्ज होतो. या फोनचे स्पीकर मध्ये हरमन कार्डन द्वारा ट्यून केले आहे. Xiaomi  च्या आपल्या क्वॉड-स्पीकर एल्गोरिथम कडून संचालित आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या